संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– बोधिमग्गो महाविहार, इसासनी-भीमनगर येथे संपन्न…
नागपूर :- असंख्य तरुण भिक्खूंचा त्याग, जिज्ञासा, चिकित्सकवृत्ती, अनुशासनबद्धता, धेय्य प्राप्ति चा दृढ निश्चय , परिवर्तनासाठी विद्रोही भुमिका, प्रवाहाच्या विरूद्ध लढण्यास सज्ज, लढवय्या योद्ध्याची उर्जा ही आचरणात आणल्यामुळे नष्टप्राय झालेल्या इतिहासाला पुर्ण स्थाई करता आले.
वर्तमान विषम काळात समाजातील लोकांनी पुर्वोत्तर समाजभूषण, कर्तबगार आदर्श व्यक्तीमत्वाच्या श्रम, त्याग, कर्तुत्वाचा सन्मान राखला पाहिजे तरच समृध्द प्रबुद्ध समाज निर्माण करता येऊ शकेल, असे उद्गार परमपुज्य डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिति दीक्षाभूमी चे विश्वस्त – भदंत नाग दिपंकर महास्थविर यांनी प्रास्ताविक पर व्यक्त केले.
बोधिमग्गो सेवा संस्था, बोधिमग्गो महाविहार, भीमनगर- इसासनी चे शिल्पकार, संस्थापक अध्यक्ष परिनिब्बुतं पुज्य भदंत बोधिविनीत महास्थविर यांच्या ७ व्या पुण्यस्मरण दिन निमित्त व भीमजन्मभूमी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चे शिल्पकार, शोधकर्ता परिनिब्बुतं पुज्य भदंत धर्मशील यांच्या १७ व्या पुण्यस्मरण दिना निमित्त अभिवादनिय कार्यक्रमात प्रमुख उद्बोधक भदंत कौडीण्य महस्थविर, गोंडखैरी यांनी पुण्यानुमोदन पर अनित्य देसना प्रदान केली.
उपरोक्त कार्यक्रमात भदंत एन. सुगतबोधि महास्थविर, भदंत रठ्ठपाल स्थवीर, भदंत जीवनदर्शी, भदंत धम्मिको, आर्यामग्गा प्रामुख्याने उपस्थित होते. संचालन डाॅ. भदंत सीलवंस महास्थविर, सचिव – बोधिमग्गो सेवा संस्था यांनी केले. भीक्खुसंघास संघदान बोधिमग्गो सेवा संस्था चे अध्यक्ष- शंकरराव निकोसे, दायीका जोहर कांबळे, शांता मेश्राम व बोधिमग्गो कम्युनिटी किचन, बोधिमग्गो संडे स्कूल, बोधिमग्गो धम्म सेवा पथक च्या उपासक – उपासिकानी केले.
उपरोक्त कार्यक्रम यशस्वी करण्यात गौतम गजभिये, अनिल मेश्राम, राजकुमार मेश्राम, गंगाधर मेश्राम, मंगेश पाटिल, ज्ञानेश्वर, सिद्धी साखरे, रश्मि पाटील, शीतल गडलिंग, आचल वासनिक, प्रज्ञा मेश्राम, मयुरी खोब्रागडे, प्रिती पाटील, अमोल बन्सोड, वैष्णवी बांगर, आकांक्षा पाटील, अबोली जाधव, सविता जाधव, संगिता हाडके, आनंद इंगळे, स्वप्निल गजभिये आदी नी परिश्रम घेतले, या प्रसगी मोठ्या संख्येत उपासक उपासिका दायक दायिका उपस्थित होते.