संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी –
ठिकठिकाणी स्वागत व प्रसादाचे वितरण ,
-पोलिसांचा कदक बंदोबस्त
कामठी ता प्र 30 :- श्री राम जन्मोत्सव शोभायात्रा सेवा समिति च्या वतीने भगवान श्रीराम नवमीच्या पर्वावर दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही काढण्यात आलेल्या शोभायात्रेने तसेच जय श्री राम नामाच्या गजराने कामठी शहर दुमदुमले. दरम्यान ठिकठिकाणी नागरिकांनी शोभायात्रेचे स्वागत करून प्रसादाचे वितरण केले. गंज के बालाजी मंदिरात सजविलेल्या रथावरील भगवान श्रीरामाच्या मूर्तीची आमदार टेकचंद सावरकर यांचे हस्ते पूजा आरती करून शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली .यावेळी संयोजक जयराज नायडू, ,रामकिशन खंडेलवाल ,सह संयोजक संजय शरण, रोशन शिरसागर, अजय कदम, संजय कनोजिया ,लाला खंडेलवाल ,मनीष बाजपाई ,श्रीकांत शेंद्रे कपिल गायधने , उजवल रायबोले,रवी लिंबाचिया ,कमलेश पांडे, आकाश देवतडे ,ऋतिक हेटे प्रथमेश नागोसे, अभय मिश्रा, सोनू सूर्यवंशी, राकेश खरौले,अंकित भाटी, मयूर भाटी, सौरभ जोशी, निखिल कोसे, शुभम रेड्डी, विजय यादव, अमन यादव, सौरभ संकाडे, जीतू गुर्जर, दिनेश गुर्जर, चिंटू भुजाडे, अंकित शिवणंकर उपस्थित होते .
शोभायात्रा पोलीस लाईन, कळमना टी पॉइंट चौक, जयस्तंभ चौक, गोयल टाकीज चौक, गांधी चौक ,सत्यनारायण चौक चावडी चौक ,दाल ओळी, मच्छी पुल ,कादर झंडा ,बोरकर चौक, नेताजी चौक ,काटी ओली फेरुमाल चौक शुक्रवारी बाजार शहरातील विविध मार्गाने नगर भ्रमण करून गंज बालाजी मंदिरात समापन करण्यात आले. शोभायात्रेचे ठिकठिकाणी नागरिकांनी स्वागत करून प्रसादाचे वितरण केले. शोभायात्रे दरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये याकरिता नवीन कामठीचे ठाणेदार भरत क्षीरसागर, जुनी कामठी चे दाणेदार दीपक भिताडे यांचे मार्गदर्शनात मोठ्या प्रमाणात कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.