ॐ महाकाली मंदिर कन्हान येथे घटस्थापनाने चैत्र महाकाली नवरात्री उत्सव

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान :- नदीच्या पावन काठावरील ॐ महाकाली मंदिर सत्रापुर कन्हान येथे चैत्र शुक्ल पंचमी (दि.१३) एप्रिल ला घटस्थापना करून धार्मिक कार्यक्रमासह चैत्र नवरात्री उत्सव साजरा करण्यात येईल.

ॐ महाकाली सेवा समिती सत्रापुर कन्हान व्दारे दरवर्षी प्रमाणे चैत्र शुक्ल पंचमी शनिवार (दि.१३) एप्रिल २०२४ ला सकाळी १० वाजता कन्हान नदीच्या पावन काठावरील प्रसिध्द ॐ महाकाली मंदिर सत्रापुर कन्हान येथे संदजी गुप्ता यांचे हस्ते विधीवत पुजा अर्चणा करून घटस्थापना करून चैत्र महाकाली नवरात्री उत्सवाची सुरूवात करण्यात येईल. नऊ दिवस जस, भजन, पुजा सह विविध कार्यक्रमाचे आयोजन करून चैत्र महाकाली नवरात्री उत्सव साजरा करून रविवार (दि.२१) एप्रिल ला सकाळी ८ वाजता पावन कन्हान नदीच्या पात्रात घट विर्सजन करून महाप्रसाद वितरण करून थाटात चैत्र नवरात्री उत्सवाची सांगता करण्यात येणार आहे. या चैत्र महाकाली उत्सवात नागपुर जिल्हा व परिसरातील भाविक भक्तानी मोठया संख्येने उपस्थित राहुन धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. असे आवाहन ॐ महाकाली सेवा समिती सत्रापुर-कन्हान चे प्रकाश कडु हयानी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ओबीसींची चळवळ सक्षम करण्यासाठी तेली समाज ठाकरेंच्या पाठीशी

Fri Apr 12 , 2024
नागपूर :- आमदार अभिजीत वंजारी यांना पद्वीधर निवडणूकीत ज्या पद्धतीने बहुजन समाजाने पाठींबा दिला होता, त्याच आधारावर आता तेली समाजही विकास ठाकरे यांना पाठिंबा देऊन ओबीसींची राजकीय चळवळ आणखी सक्षम होणार असल्याचा विश्वास माजी उपमहापौर व राष्ट्रवादीचे नेते शेखर सावरबांधे यांनी व्यक्त केला. जवाहर विद्यार्थी गृह येथे आमदार अभिजीत वंजारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मेळाव्यात महाविकास आघाडीचे उमेदवार विकास ठाकरे यांना […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com