नागपुर :- विदर्भातील एक प्रमुख कांग्रेस नेते, माजी मंत्री आणि अमरावती चे माजी आमदार, ज्यांनी २०१४ चे विधानसभा निवडणुकीत भाजपा मध्ये प्रवेश केला होता आणि त्यानंतर २०२० ला पुन्हा काँग्रेस पार्टी चा झेंडा हाती घेतला असे आमचे मित्र लोक नेते डॉ.श्री. सुनिल देशमुख यांचे फेस बुक अकाऊंट वर आज अचानक अपडेट करण्यात आलेला फोटा श्री रामाच्या आज गर्भ गृहात पोहचलेल्या मूर्ती चा असल्याने सुनिल भाऊंच्या मनातील “जय श्रीराम” पुन्हा जागृत होत आहे की काय ? असे वाटू लागले आहे.
राजकारणात कोणतीही गोष्ट सहज घडत नाही, त्या मागे कांहीं ना कांहीं मॅसेज दडलेला असतो च !
डॉ. सुनिल देशमुख यांनी अप डेट केलेला फेस बुक फोटो खूप बोलका आहे, असे मला वाटते !
*नजीकच्या भविष्यात काय दडले आहे ते कळेलच पण आता हॉट सिझन आहे म्हणून आपण सर्वांना श्री जय श्रीराम ~ मोठा राम राम !!