कोट्यवधींची रोकड सापडलेल्या काँग्रेस खा.साहू यांच्या विरोधात भाजपा महिला मोर्चा तर्फे राज्यभर निदर्शने

मुंबई :- कोट्यवधींची बेहिशेबी मालमत्ता सापडलेल्या काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टी प्रदेश महिला मोर्चाने सोमवारी राज्यभरात आक्रमक होत आंदोलन केले. मुंबईत चर्चगेट येथे महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. ”मोहब्बत की दुकान” चा सेल्समन असलेल्या साहू यांच्याकडे इतका अमाप काळा पैसा असेल तर दुकानाच्या मालकाकडे किती काळा पैसा असेल असा सवाल वाघ यांनी यावेळी बोलताना केला.

७० वर्षे गरीबांचा पैसा लुटणा-या कॉंग्रेसच्या अन्य नेत्यांवर देखील छापे टाकत त्यांची अवैध संपत्ती जप्त करून पै न पै चा हिशोब मोदी सरकार कडून केला जाईल असा विश्वास वाघ यांनी व्यक्त केला. कॉंग्रेसच्या राहुल गांधीच्या मोहोब्बत की दुकान मधले खासदार साहू यांच्याकडे अमाप रोकड सापडल्यानंतर जनतेचे पैसे लुटणा-या कॉंग्रेसचा भ्रष्ट चेहरा समोर आला. गरीबी हटाओ चा नारा देणा-या कॉंग्रेसने लाज बाळगायला हवी असा घणाघातही वाघ यांनी केला. चर्चगेट येथे झालेल्या आंदोलनात महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष वर्षा भोसले, मृणाल पेंडसे, डॉ.मंजुषा कुद्रीमोती, रितू तावडे, मृणाल खेडकर, राजवी नाईक, त्रिशला हंचाटे, अर्चना देसाई, रंजू झा, बीना गोगरी, रूपाली लठ्ठे, रश्मी जाधव, प्रिया शर्मा, मंगल वाघ, ममता परमानी यांच्यासह असंख्य कार्यकर्त्या व पदाधिकारी सहभागी झाल्या होत्या.

खा.साहू विरोधात काही ठिकाणी जोडे मारो आंदोलन तर काही ठिकाणी साहू यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. मोहब्बत की दुकान, चोरी का सामान…मोदी जी बोले तो देश की गॅरंटी और कॉंग्रेस बोले तो चोरी की गॅरंटी.. जनता करणार नाही माफ, भ्रष्ट कॉंग्रेसींना करा साफ अशा आशयाचे फलक घेऊन साहू आणि कॉंग्रेस विरोधात ठिकठिकाणी घोषणाबाजी देखील करण्यात आली. भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्याचा विडा उचलणाऱ्या मोदी सरकारच्या कारकिर्दीत भ्रष्ट कॉंग्रेसच्या नेत्य़ांकडून जनतेचा लुटलेला एक-एक पैसा परत दिला जाईल ही ‘मोदी की गॅरंटी’ आहे असा विश्वास आंदोलनांवेळी व्यक्त करण्यात आला. पुणे, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, नगर अशा अनेक ठिकाणी झालेल्या आंदोलनात हर्षदा फरांदे, स्वाती शिंदे, रूपाराणी निकम, धनश्री तोडकर, सुनिशा शहा, संगिता खंदारे आदी सहभागी झाल्या होत्या..

NewsToday24x7

Next Post

ना. नितीन गडकरी यांना भेटून चिमुकलीला अश्रू अनावर! जनसंपर्क कार्यक्रमात व्यक्त केली कृतज्ञता

Mon Dec 11 , 2023
नागपूर :- केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या मदतीमुळे आपल्या हृदयावर शस्त्रक्रिया होऊ शकली आणि आज आपण ठणठणीत आहोत, या भावनेने एका चिमुकलीला अश्रू अनावर झाले. जनसंपर्क कार्यक्रमातील हा क्षण साऱ्यांनाच भावूक करून गेला. Your browser does not support HTML5 video. ना. नितीन गडकरी यांना भेटण्यासाठी नागरिकांनी सकाळपासून गर्दी केली होती. या गर्दीत संतोष यादव यांच्यासोबत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com