संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 10 :- स्थानिक नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या जयस्तंभ चौकातील एका कुलूपबंद पांनठेल्याजवळ एक 65 वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याची घटना काल सायंकाळी साडे पाच दरम्यान निदर्शनास आली असून मृतकाची ओळख अजूनही पटलेली नाही.
पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पुढील उत्तरीय तपासणीसाठी शवविच्छेदनगृहात हलविण्यात आले आहे.मृतक पाच फूट उंचीचा असून चेहरा लांबट, काळे पांढरे असलेले डोक्याचे केस , काळ्या पांढऱ्या रंगाची दाढी मिशी वाढलेली.अंगात पांढऱ्या मळकट रंगाचा शर्ट परीधान असून अर्धनग्न अवस्थेत आहे.सदर वर्णनाच्या इसमाची ओळख असल्यास नवीन कामठी पोलीस स्टेशन ला संपर्क साधण्याचे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष वैरागडे, पोलीस उपनिरीक्षक नितीन पवार यांनी केले आहे .