नागपूर :- राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेच्यावतीने 49 व्या संसदीय अभ्यासवर्गाचे विधानभवन नागपूर येथे 20 ते 27 डिसेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले होते. या संसदीय अभ्यासवर्गाचा आज विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत, अवर सचिव सुनील झोरे तसेच राज्यातील बारा विद्यापीठांतील विद्यार्थी व अधिव्याख्याते यांच्या उपस्थितीत समारोप झाला. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या हस्ते अभ्यासवर्गात सहभागी झालेल्या विद्यार्थी व प्राध्यापकांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठाच्या प्रा.डॉ.विद्या चौरपगार यांनी राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेने या अभ्यासवर्गाचे आयोजन केल्याबद्दल आभार व्यक्त केले. अवर सचिव सुनील झोरे यांनी अभ्यासवर्ग यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.
Next Post
नागपूर विधानभवन मध्यवर्ती सभागृहासाठी जमीन अधिग्रहणाबाबत त्वरित कार्यवाही करावी - विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांचे निर्देश
Wed Dec 28 , 2022
नागपूर : नागपूर येथील विधानभवन येथे मध्यवर्ती सभागृहाचे बांधकाम करण्यासाठी जमीन अधिग्रहण करणे तसेच मुंबईतील मलबार हिल येथील अजंठा शासकीय निवासस्थान व त्या अखत्यारितील मोकळी जागा ही महाराष्ट्र विधिमंडळास वर्ग करण्याबाबत आज विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यासंदर्भात पुढील एक महिन्यात कार्यवाही करून अहवाल सादर करावा, असे निर्देश यावेळी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. […]

You May Like
-
May 12, 2022
जुनी कामठी पोलीस स्टेशन दुय्यम पोलीस निरीक्षकविना
-
October 5, 2022
विजयादशमी निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा
-
September 7, 2023
17 महिन्यात दिल्या 10 हजारावर कृषीपंपांना वीज जोडण्या
-
October 5, 2023
पारशिवनी महामार्ग की समस्या अविलिंब दूर करे – मनसे
-
August 7, 2022
मनपा शाळेच्या विद्यार्थ्यांनी बनविली ” तिरंगा राखी “