कामठी तालुक्यात पुन्हा दमदार पावसाची हजेरी.

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

-कामठी तालुक्यात अतिवृष्टीचा कहर

कामठी ता प्र 10 :- वरून राजाने जुलै महिन्यात दिलेल्या संततधार पावसात 13 जुलै दरम्यान झालेल्या पावसामुळे कामठी तालुक्यात पावसाचा चांगलाच कहर माजला होता.त्यानंतर पावसाने अल्प विश्रांती घेतल्यानंतर या ऑगस्ट महिन्याला सुरुवात होऊन काही दिवस लोटत नाही तोच मागील तीन दिवसापासून 7 ऑगस्ट पासून कामठी तालुक्यात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार जिल्हाधिकारी कार्यालयातुन ऑरेंज अलर्ट सुद्धा जाहीर करण्यात आले आहे.त्यानुसार सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे कामठी तालुक्यातील ग्रामीण भागात नदी, नाले, ओढे , पूल भरगच्च भरले असून शेती पाण्याखाली गेली असून केम, आडका, शिवणी यासारख्या कित्येक गावांचा संपर्क तुटला, गावात जलमय परिस्थिती निर्माण झाली असून केम-शिवणी रस्ता बंद करण्यात आला आहे.नाग नदीचा पाणी गावात आल्याने शेतात पाणीच पाणी असल्याने परत एकदा शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या अतिवृष्टीच्या पावसामुळे सोनेगाव राजा गावातील तीन घरे कोसळली सुदैवाने जिवित्तहानी टळली असून ग्रामीण भागात घरांची पडझड सुरू असल्याने त्यांचा निवाऱ्यांचा व उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होत आहे.

7 ऑगस्ट पासून सुरू असलेल्या अतिवृष्टी संततधार मुसळधार पावसाने लावलेल्या हजेरीमुळे कामठी तालुक्यात चांगलाच कहर बरसला असून तालुक्यातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले.झालेल्या पावसाच्या नोंदीनुसार कामठी तालुक्यातील चार मंडळात आज सरासरी 84.9 मी मी पाऊस पडल्याची नोंद करण्यातआली .यानुसार कोराडी येथे 54.4मी मो , वडोदा 110.6मी मी, दिघोरी 86.6मी मी, कामठी 88मी मी पावसाची नोद आहे. यानुसार 8 ऑगस्ट ला सरासरी 72 .1 मी मी पावसाची नोंद झाली ज्यामध्ये कोराडी 68.8मी मी, वडोदा 102.2 मी मी, दिघोरी 44.2 मी मी , कामठी 73.2 मी मी पाऊस पडला तर 9 ऑगस्ट ला सरासरी 50.8 मी मी पावसाची नोंद करण्यात आली असून कामठीत 28.3 मी मी, कोराडी 52.2 मी मी, वडोदा 70.2 मी मी तर दिघोरी 52.6 मी मी पाऊस पडल्याची नोंद आहे.

सतत सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कामठी शहरातील काही भागातील नाले, ओढे चांगलेच भरगच्च भरले तर येथील चंद्रमनी नगरात पाणी शिरल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागली तसेच ग्रामीण भागातील वडोदा-भुगाव सर्कल भागात सुद्धा पावसाने चांगलेच थैमान घातल्याने शेती पूर्णता पाण्यात भिजले तर कित्येक घरात पाणी शिरले सुदैवाने कुठेही जीवितहानी घडली नाही.यानुसार केम शिवणी, आडका ,भुगाव येथे पावसाने चांगलेच थैमान घातले असल्याने घरामध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे घरातील अन्न धान्य ची नासाडी झाली तसेच आडका गावातील जिल्हा परिषद शाळेत सुदधा पाणी शिरल्याची स्थिती निर्माण झाली होती.सोनेगाव राजा येथे सुद्धा पावसाचा कहर बरसल्याने ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झाले असून गावातील तीन घरे कोसळले सुदैवाने जीवितहानी टळली .

कामठी तहसीलदार अक्षय पोयाम यांनी नागरिकाना ऑरेंज अलर्ट जाहीर झाला असून नदी नाल्या काठी राहणाऱ्या नागरीकाना सतर्कतेचा ईशारा देत घरी खाली करण्याचे फर्मान सोडले होते तर याच संदर्भात तालुक्याला असलेला अतिवृष्टीचा धोका लक्षात घेता तहसीलदार अक्षय पोयाम, बीडीओ अंशुजा गराटे , सभापती उमेश रडके यांनी आज कामठी तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या दिघोरी, महालगाव, केम, शिवणी, आडका,सोनेगाव राजा बिना , आदी गावांना भेटी देत पूरपरिस्थिती ची पाहणी करीत नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा तालुक्यातील ईशारा देत नदीकाठावरील घरे खाली करण्याचे फर्मान सोडले .तसेच या मुसळधार पावसात निर्माण होणाऱ्या अडचणीवर नियंत्रण साधण्यासाठी उपाययोजना करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली . व ग्रामीण भागाचा पाहणी करीत आढावा घेतला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

देवरी चेक पोस्टवर 47 किलो गांजा जप्त; आरोपीस अटक

Wed Aug 10 , 2022
अमरदिप बडगे, प्रतिनिधी  – पोलिस निरीक्षक रेवंचद सिंगनजुडे यांची मोठी कारवाई गोंदिया –  जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील शिमा शुल्क तपासनी नाका शिरपुर/बांध येथे देवरी पोलिसानीं आज दुपारी ४ वाजता सुमारास रायपुर कडुन नागपुर कडे जात अलेल्या सहा चाकी वाहनाची झळती घेतले असता त्या वाहनात ४७ किलो गांजा आढळुन आल्याने तालुक्यातील ही मोठी कारवाई देवरी पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक केल्याची चर्चा चांगलीच […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com