बाळासाहेब ठाकरे प्राणिसंग्रहालयात एका बिबटचा मृत्यू

नागपूर :- गेल्या आठवड्यात प्राणिसंग्रहालयातील एक मादी बिबट (चांदणी) सफारी पिंजऱ्यामधून रात्र निवाऱ्यात न परतल्याने गेले ३ दिवस या मादीचा शोध घेण्याचे काम चालू होते. रविवारी संध्याकाळी या बिबटला पकडण्याकरिता पिंजऱ्यामध्ये बिबट पकडण्याचा पिंजरा लावण्यात आला होता. सोमवारी पहाटे या पिंजऱ्यात एक नर बिबट पकडला गेला. हा नर बिबट गोरेवाडा जंगलातून या सफारी पिंजऱ्यात शिरल्याचे लक्षात आल्याने सोमवारी चांदणीला शोधण्यासाठी शोध मोहीम सुरु करण्यात आली. दिवसभराच्या शोधमोहीमेनंतर संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास चांदणी मृतावस्थेत आढळली.

वन्य बिबट्यासोबत भांडणामध्ये या मादीचा मृत्य़ू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सायंकाळी उशीरा या मादीचे शव-विच्छेदन होऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. पकडलेल्या वन्य बिबटला सायंकाळी उशीरा निसर्गमुक्त करण्यात आले.

 

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com