खसाळा येथे हनुमान मंदिर महाद्वार व सामाजिक सभागृहाचे आमदार टेकचंद सावरकर यांच्या हस्ते भूमिपूजन

– धार्मिक व सामाजिक बांधिलकी जोपासणे हे प्रत्येक जनप्रतिनिधीचे कर्तव्य – आ टेकचंद सावरकर

कामठी :- शासकीय प्रणालीतून विकास कामे हे होतच असतात परंतु त्यातून धार्मिक व सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम जनप्रतिनिधीने केले पाहिजे त्यातूनच गावाच्या विकास घडतो व समाजासोबत समाज जोडण्याचे काम आपोआप होते माजी पालकमंत्री व भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात विकास कामांना गती देण्याचे काम करू असे मौलिक प्रतिपादन कामठी तालुक्यातील खसाळा येथील एक करोड निधीतून होणाऱ्या हनुमान मंदिर महाद्वार व सामाजिक सभागृह बांधकामाच्या भूमिपूजनाप्रसंगी आमदार टेकचंद सावरकर यांनी केले. गावात नागरिकांच्या आरोग्य मूलभूत सुविधा व इतरत्र गरजेच्या साधनाचे ग्रामपंचायत द्वारे प्रत्येक ठिकाणी मुबलक सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी आ चंद्रशेखर बावनकुळे आमदार टेकचंद सावरकर यांचे आभार व्यक्त केले.

कार्यक्रमाला प्रामुख्याने कामठी मौदा विधानसभा क्षेत्राचे आमदार टेकचंद सावरकर, माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल निधान, जिल्हा परिषद सदस्य मोहन माकडे, माजी प स उपसभापती उमेश रडके, भाजप युवा जिल्हा महामंत्री संकेत बावनकुळे, वरिष्ठ भाजप नेते माजी उपसरपंच देवराव डाखोळे, सामाजिक कार्यकर्ता नारायण बावनकुळे, हनुमान मंदिर खसाळाचे अध्यक्ष साधुजी नभने, उपाध्यक्ष गुलाब बावनकुळे, मोहन वैरागडे ,माजी सरपंच रवी पारधी ,धनंजय इंगोले , ग्राम सचिव अरुण बोंद्रे, कवठा म्हसाळा चे सरपंच निलेश डफरे, उपसरपंच रवींद्र कुहीटे, सदस्य रवींद्र पारधी, अमोल वाघमारे, कुणाल गव्हाणे, छबु रोकडे, प्रेरणा बावनकुळे, अश्विनी भलावी, अर्चना शंभरकर, प्रतिभा गबने, प्रामुख्याने उपस्थित होते सरपंच जयश्री धनंजय इंगोले यांनी आमदार चंद्रशेखर बावनकुळे आमदार टेकचंद सावरकर यांनी दिलेल्या विकास निधीबद्दल आभार व्यक्त करीत भविष्यात गावाच्या विकासाकरिता अशीच निधी उपलब्ध करून द्यावी अशी विनंती केली . कार्यक्रमाचे संचालन मोहन वैरागडे यांनी केले तर आभार प्रदर्शन उपसरपंच अतुल बावनकुळे यांनी केले.

NewsToday24x7

Next Post

नवीन रिंग रोड ठरणार औद्योगिक वसाहतींना जोडणारा दुवा - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Mon Feb 5 , 2024
–  जामठा ते फेटरी आउटर रिंग रोडचे लोकार्पण; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती नागपूर :- बुटीबोरी व हिंगणा येथील एमआयडीसीला जोडणारा दुवा म्हणून नवीन रिंग रोड उपयुक्त ठरणार आहे. या मार्गामुळे सर्वसामान्य नागरिकांची सोय तर होणारच आहे, शिवाय उद्योगांच्या माध्यमातून विकासाचा व रोजगाराचा मार्गही प्रशस्त झाला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com