नागपूर :- जुनी तेलंगखेळी सिव्हिल लाईन नागपूर येथील पश्चिम नागपूरात खैरे कुणबी समाजाचा स्नेहमिलन सोहळा, मोठा हनुमान मंदिर जुनी तेलंगखेळी येथे नुकताच सोहळा पार पडला. या कार्यक्रमाच्या वेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुभाष चौधरी तर आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनोद चौधरी आणि गुणेश्वर आरिकर, स्वप्नील मोंडे, अंकुश पिंपरे, व निलेश महाजन, यांची प्रामुख्याने उपस्थिती होती व इतरही मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाला जवळपास ७०० समाजबांधव व भगिनींचा समावेश होता. समाजातील बरेच प्रतिष्ठित नागरिक व खरै कुणबी समाज आघाडी पश्चिम नागपूर येथील पदाधिकारी व संघटन प्रमुख महादेव वैद्य, मोहन डंबारे, रमेश चौधरी, ज्ञानेश्वर शेंडे, राजेंद्र महाजन, सुनील मगरे, दिगंबर शेंडे, सुरेंद्र पुणेकर व सभासद सदस्य विजय गुलाबराव शिवनकर, अंबादास शेंडे, महेश वासुर्के, मनोहर बारई तसेच महिला सदस्य रेखा डोंगरे व विजया सायरे या प्रामुख्याने उपस्थित होत्या.
या कार्यक्रमात सर्व समाज बांधवांनी खूप परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्यावेळी डॉ. सुभाष चौधरी यांनी समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले तर प्राचार्य विनोद चौधरी यांनीही समाज संघटनेचे फायदे समजावून सांगितले. सामाजिक माहिती, एकत्रीकरण करण्याचे, सामाजिक परिणाम, याविषयी माहिती दिली. या कार्यक्रमाला पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांनी भेट दिली. त्यांनीही समाजाच्या भवनासाठी पाहिजेत ते मी मदत करील. असे आश्वासन दिले. जे माझ्या परीने होईल ते मी पूर्ण करील असे समाज बांधवांना यावेळी सांगितले. खैरे कुणबी समाज बांधवांनी प्रीती भोजाचा आनंद घेतला व हसत खेळत समाज बांधवांनी जय शिवराय व जय तुकाराम महाराज ज्याच्या जय घोषणांनी निरोप घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष मोहन डंबारे यांनी तर संचालन विजय शिवणकर यांनी केले तर आभार अंबादास शेंडे यांनी मानले. आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.