अवैधरीत्या शस्त्र बाळगणाऱ्या आरोपीला अटक

-स्थानिक गुन्हे शाखा, नागपुर ग्रामीण ची कारवाई 

नागपूर :-दिनांक ०३/०७/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे सावनेर उपविभागात पेट्रोलिंग करीत असतांना गोपनिय मुखबिरकडुन माहिती मिळाली की, पो.स्टे. केळवद हद्दीत मौजा मंगसा गावाजवळ एक काळया रंगाची बजाज पलसर एक पांढया रंगाचे टी शर्ट घातलेला इसम आपल्याजवळ देशी कट्टा घेवून फिरत आहे. अशा माहितीवरून पंच व स्टाफ सह जाऊन त्याचा शोध घेऊन सदर इसमास  ताब्यात घेऊन यातील आरोपी विक्की देविदास चंद्रिकापुरे, वय ३५ वर्ष, रा. कुचक मोहल्ला पिपळा डाग बंगला, ता. सावनेर, जि. नागपूर हा आपले जवळ देशी कट्टा बाळगून अप्रीय घटना करण्याचे उद्देशाने मौजा मंगसा गावाजवळ फिरतांना मिळुन आल्याने आरोपीस पकडले असता पंचा समय त्यांची झडती घेतली असता त्याचे अंगझडतीत १) एक लोखंडी देशी कट्टा किमती अंदाजे २०,००० /- रुपये २) एक जिवंत काडतुस किमती अंदाजे किंमत २०००/- रुपये सह मिळुन आला. ३) एक दुचाकी वाहन क्र. MH-४० BM ०२५२ किंमती अंदाजे ८०,०००/- रुपये असा एकूण किमती अंदाजे १,०२,०००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर हत्यारा बाबत आरोपीला परवाना विचारला असता त्याच्या जवळ कोणत्याही प्रकारचे कागदपत्रे मिळुन आले नाही. आरोपीला जप्त मुद्देमालासह पुढील कायदेशीर कार्यवाही करीता पोलीस ठाणे केळवद यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कार्यवाही नागपुर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदिप पखाले यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सहायक पोलीस निरीक्षक राजीव कर्मलवार, पोलीस हवालदार राजेंद्र रेवतकर, पोलीस नायक आशिष मुंगळे, किशोर वानखेडे, विरेंद्र नरड, उमेश फुलवेल, प्रमोद भोयर, चालक पोलीस हवालदार अमोल कुधे यांचे पथकाने केली

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अवैध रेती चोरी करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल 

Tue Jul 4 , 2023
पोलीस स्टेशन रामटेकची कार्यवाही नागपूर :- पोलीस स्टेशन रामटेक येथील स्टाफ रामटेक उपविभागात पेट्रोलिंग करीत असतांना मुखबिरद्वारे खबर मिळाली की, पोलिस ठाणे रामटेक हद्दीतील ०६ किमी अंतरावर नवरगाव शिवार रामटेक येथे अवैधरीत्या विनापरवाना रेतीची टिप्पर व्दारे चोरटी वाहतुक होत आहे. अशा मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलीस स्टेशन रामटेक येथील स्टाफ याने नमुद घटनास्थळी जावुन टिप्पर क्र. एम. एच. ४९ ए. डी. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com