खापा :- दिनांक ०३/१०/२०२३ चे १६.०० वा. दरम्यान फिर्यादीचा अल्पवयीन मुलगा वय १० वर्ष हा गुमगाव मार्डन येथे फुटबॉल खेळण्याकरीता गेला असता यातील आरोपी नामे- विशाल प्रभु जनबंधु वय २४ वर्ष, रा. गुमगाव माईन खापा याने फिर्यादीच्या मुलाला आपल्या स्कुटीवर बसवून चॉकलेट घेवुन देतो असे म्हणुन गुमगाव माईन च्या ग्राउंड च्या बाजुला असलेल्या जंगलात घेवुन गेला. फिर्यादीच्या मुलाशी अनैसर्गिक कृत्य केले.. सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरुन पो स्टे खापा येथे आरोपीविरुद्ध कलम ३६३, ३७७ भादवि सहकलम ४६ पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. यातील आरोपीला अटक करण्यात आली असुन गुन्हयाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक प्रियंका गेडाम या करीत आहे.
अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या आरोपीस अटक
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com