पो.स्टे. बुट्टीबोरी :- दिनांक १७/०१/२०२३ चे १०.०० वा. ते १४.०० वा. सुमारास पिडीत मुलगी व आरोपी नामे- संजय आत्माराम तायडे, वय ५२ वर्ष ते एकमेकांचे घरा शेजारी राहत असुन यातील पिडीत मुलगी तिचे घरी एकटीच हजर असतांना यातील आरोपीने फिर्यादीचे घराचे मागील दरवाज्यातुन घराचे आत जावुन घराचा समोरचा व मागचा दरवाजा आतून बंद केला आणि फिर्यादीचा हात पकडुन ओरडु नकोस मला संबंध करू दे व ओरडशिल तर जिवाने मारूण टाकीन असे म्हणुन जबरदस्तीने शारीरीक संबंध प्रस्थापित केले व तु कोनाला या बददल सांगायचे नाही. तु जर सांगीतले तर तुला जिवाने मारूण टाकीन अशी धमकी दिली.
सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. बुट्टीबोरी येथे आरोपीविरुध्द कलम ३७६, ४५२, ५०६ सहकलम ४ बाल लैंगक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून गुन्हयाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक लभाने हे करीत आहे.