गडकरींच्या स्वागतासाठी शताब्दी चौकात लोटला जनसागर

– दक्षिण-पश्चिम नागपुरातील लोकसंवाद यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

नागपूर :- केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या दक्षिण-पश्चिम नागपुरातील लोकसंवाद यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी शताब्दी चौकामध्ये गडकरींच्या स्वागतासाठी मोठ्याप्रमाणात जनसागर लोटला होता.

ना. नितीन गडकरी यांची लोकसंवाद यात्रा शुक्रवारी दक्षिण-पश्चिम नागपुरात दाखल झाली. सलग दुसऱ्या दिवशी पावसाने अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पण कार्यकर्त्यांच्या उत्साहापुढे पावसालाही हात टेकावे लागले. मनीष नगर येथील महाजन आटाचक्की परिसरातून यात्रेला प्रारंभ झाला. यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते प्रा. जोगेंद्र कवाडे, माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे, आमदार मोहन मते, आमदार प्रवीण दटके, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) शहराध्यक्ष प्रशांत पवार, शिवसेनेचे (शिंदे गट) नेते सुरज गोजे, माजी महापौर अर्चना डेहनकर, माजी नगरसेवक अविनाश ठाकरे, माजी नगरसेवक संदीप गवई यांची उपस्थिती होती.

मनीषनगर येथून नरेंद्र नगर येथे लोकसंवाद यात्रा पोहोचली. याठिकाणी प्रत्येक वॉर्डात नागरिकांनी पुष्पवर्षाव करून गडकरींचे स्वागत केले आणि निवडणुकीतील दमदार विजयासाठी शुभेच्छा दिल्या. श्रीनगर, सुयोगनगर या मार्गाने शताब्दी चौकात यात्रा पोहोचली. शताब्दी चौकात गडकरींचे दमदार स्वागत झाले. भव्य पुष्पहार घालून याठिकाणी ना. गडकरी यांचे स्वागत करण्यात आले. परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने शताब्दी चौकात एकत्र आले होते. त्यानंतर अभयनगर व ओंकारनगर मार्गे लोकसंवाद यात्रा रामेश्वरीच्या दिशेने निघाली. परिसरातील महिला व तरुणांनी गडकरींचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. इंदिरानगर, गणेशपेठ, धंतोली या मार्गाने मेहाडिया चौकात यात्रा दाखल झाली आणि याठिकाणी समारोप झाला. यात्रेमध्ये तरुण कार्यकर्ते बाईकद्वारे सहभागी झाले होते.

आज दक्षिण नागपुरात

ना. नितीन गडकरी यांची लोकसंवाद यात्रा उद्या (शनिवार, दि. १३ एप्रिल) दक्षिण नागपुरात दाखल होणार आहे. सकाळी साडेआठ वाजता रमणा मारोती येथून यात्रेला प्रारंभ होईल. त्यानंतर ईश्वरनगर, कुकरेजा पॅरिस सिटी, दत्त मंदिर, मंगलमूर्ती लॉन, शारदा चौक, तिरंगा चौक, सक्करदरा चौक, आयुर्वेदिक कॉलेज, महाकाळकर भवन, सुर्वे ले-आऊट, दत्तात्रय नगर, ताजबाग दर्गा, शहनशाह चौक, न्यू सुभेदार, उदय नगर रोड, गजानन शाळा, अयोध्यानगर चौक, नागोबा मंदिर, शारदा चौक, रक्षक किराणा, तुकडोजी चौक, प्रोफेसर कॉलनी, विमा दवाखाना, हनुमान नगर, मेडिकल रोड या मार्गाने चंदनगनर पोलीस स्टेशन परिसरात यात्रेचा समारोप होईल.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

डॉ.आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला संविधान चौकात पोलिस बंदोबस्त

Fri Apr 12 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – भदन्त ससाई पोलिस आयुक्तांना भेटले नागपूर :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला संविधान चौकात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात यावा, अशा आशयाचे निवेदन प. पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमी चे अध्यक्ष तथा धम्मसेना नायक भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांना दिले. पोलिस आयुक्त कार्यालयात भेट घेवून त्यांच्याशी या संदर्भात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com