खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस केवळ ४ तासात अटक.

नागपूर – दि 14.07.2022 चे 15ः00 वा चे सुमारास फिर्यादी महेश चिंधुजी बेलापांडे वय 54 वर्ष  रा. वर्धमान नगर, देशपांडे ले-आउट प्लॉट नं 869, नागपुर यांची पो.स्टे. नंदनवन हद्दीत न्यु नंदनवन येथे अथर्व ज्वेलर्सचे दुकान आहे. फिर्यादी व आरोपी पियुश राजेश सोनकुसरे वय 25 वर्ष रा. विदर्भ सोसायटी उदय नगर, प्लॉट नं 403, नागपुर हे दोघे ओळखीचे असुन, आरोपीने फिर्यादीस फोन केले व सांगितले की, मला सो. गोफ व अंगठी घ्यायची आहे. तर फिर्यादी यांनी आरोपीस दुकानात बोलवले. आरोपी हा दुकानात आला असता फिर्यादी ने त्याला 6 नग सोन्याची अंगठी असलेला ट्रे दाखविला. आरोपी हा दागिने पाहत असतांना टाईमपास करीत होता.

त्यावेळी फिर्यादी यांनी आरोपीस म्हटले की, तुला दागिने घ्यायचे असतील तर घे, नाही तर राहु दे. याकारणा वरून आरोपीस राग आल्याने त्याने रागाच्या भरात फिर्यादीचे गळयावर आपल्या जवळ असलेल्या चाकुने, वर करून गंभीर जख्मी करून जिवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी यांनी प्रतीकार केला असता त्याचे दोन्ही हाताचे तळवे व बोटाना मार लागला. तसेच चाकुचा धाक दाखवुन 6 नग सोन्याची अंगठी किंमत अंदाजे 1,25,000/-रू असा मुद्देमाल जबरीने हिसकावुन नेला होते . याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरूध्द कलम 307, 394 भादवि अन्वये गुन्हा नोंदविला असून गुन्हे शाखेच्या युनिट 4 ने  आरोपीस अटक केले आहे व पुढील तपास  करीत पो.स्टे नंदनवन यांचे ताब्यात देण्यात आलेले आहे.

सदर कामगिरी गुन्हे शाखेचे पोलीस उपयुक्त चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जामदार ,सहा पोलीस निरीक्षक निलेश वाघमारे ,म पो उप निरीक्षक निरंजना उमाळे ,पो हवा सुनील ठवकार,रवींद्र पाणबुडे,मेश्राम,पो ना युवा कडू ,संदीप मावलकर, पुरुषोत्तम ,आशिष क्षीरसागर , दीपक चोले ,स्वप्नील , श्रीकांत यांनी पार पाडली.

 

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com