पालकमंत्र्यांकडून प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रम स्थळाची पाहणी

यवतमाळ :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थिती दिनांक २८ फेब्रुवारी रोजी शहरानजीक भारी येथील मैदानात बचतगटांच्या महिलांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याच्या स्थळाची पालकमंत्री संजय राठोड यांनी आज पाहणी केली.

यावेळी पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, पोलिस अधीक्षक डॉ.पवन बन्सोड, बांधकामचे अधीक्षक अभियंता संभाजी धोत्रे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री संजय राठोड यांनी कार्यक्रमस्थळी उभारण्यात येत असलेला स्टेज, मंडप, वाहनतळ, सुरक्षा, बैठक व्यवस्था, तात्पुरत्या स्वच्छता व्यवस्थेची पाहणी केली व आढावा घेतला. स्टेज, मंडप उभारणीसह सर्व कामे कालमर्यादेत होतील याबाब जिल्हाधिकारी व अन्य अधिकारी यांच्यासोबत त्यांनी चर्चा केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नोंदणीकृत बांधकाम कामगारांनी मंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा - संजय राठोड

Sat Feb 24 , 2024
* दिग्रस येथे बांधकाम कामगारांना साहित्याचे वाटप * तालुक्यातील २५०० नोंदणीकृत कामगारांना लाभ यवतमाळ :- नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी शासनाच्यावतीने शिक्षण, आरोग्य व रोजगाराच्या योजना राबविण्यात येतात. या योजनांचा कामगारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. पालकमंत्री राठोड यांच्याहस्ते दिग्रस तालुक्यातील २ हजार ५०० नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गृहोपयोगी साहित्य संचाचे वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com