बंद पथदिवे सुरु करण्याच्या मागणीसाठी सरपंच संघटनेचे सामूहिक निवेदन

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 
कामठी ता प्र 25:- कामठी तालुक्यातील ग्रामपंचायत अंतर्गत येणारे स्ट्रीट लाईट (पथ दिवे )बिल भरण्याची जबाबदारी शासन निर्णय प्रमाणे ग्रामविकास मंत्रालय ची असल्यामुळे सदर चर्चा करून ग्रामपंचायत चे पथदिवे कनेक्शन न तोडता निर्णय घ्यावा. असे निवेदन माजी पालकमंत्री ,तसेच ऊर्जामंत्री नागपूर,विद्यमान विधान परिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्यात आले.तसेच संबंधित अधिकारी यांच्याशी चर्चा करून वीजपुरवठा पूर्वव्रत सुरू करा असे आदेश देण्यात आले तसेच या विषयावर लवकरच तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन दिले .तसेच हे निवेदन अधिकाऱ्यांना पंचायत समिती कामठी येथे देण्यात आले.
याप्रसंगी मुख्यकार्यकारी अधिकारी फुटाणे , तसेच गटविकास अधिकारी अंशुजा गराटे ,सभापती उमेश रडके ,तसेच जिल्हा परिषद सदस्य नाना कंभाले, सरपंच संगठना अध्यक्ष प्रांजल वाघ तसेच कामठी तालुका अध्यक्ष बंडू मोरेश्वर कापसे ,खसाळा ग्रा प सरपंच रवी पारधी,, सोनेगाव राजा ग्रा प सरपंच चंदू हेवट, जाखेगाव सरपंच राजू आखरे, भिलगाव सरपंच शीतल पाटील , लोंणखैरी ग्रा प सरपंच लीलाधर भोयर ,वडोदा ग्रा प सरपंच वनिता ताई इंगोले आदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

निवडणूकीच्या पाश्वरभूमीवर इच्छुक उमेदवार लागले कामाला!

Sat Jun 25 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 25 :- येत्या काही दिवसांमध्ये कामठी नगर परिषद ची निवडणूक प्रक्रियेचा डंका वाजणार आहे. अश्यातच आता विद्यमान नगरसेवकासह निवडणुकीच्या रिंगणात उतरणारे इच्छुकांचे दर्शन देखील आता व्हायला लागले आहे.आणि आताच्या निवडणुकीच्या काळात काही अपवाद व्यक्ती वगळता कधी न दिसणारे चेहरे ही समाजसेवेत उतरले दिसून येत आहेत त्यातच आगामी निवडणुकीच्या पाश्वरभूमीवर हवसे नवसे व इच्छुक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com