धारदार व घातक शस्त्र बाळगणाऱ्या आरोपीस अटक

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान :- पोलीस स्टेशन अंतर्गत गोंडेगाव कॉलरी येथे धुलीवदन च्या दिवसी दोघे जण दुचाकीने हातात धारदार तलवार घेऊन लोकांमध्ये दहशत निर्माण करणा-यास पोलीसानी दुचाकी चालकास पकडले तर मागे स्वार बसलेला पसार झाला. दुचाकी व धारदार तलवार असा सोळा हजाराचा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरूध्द गुन्हा नोंद केला.

सोमवार (दि.२५) मार्च ला पोलीस स्टेशन कन्हान येथील स्टाफ धुलीवंदन बंदोबस्त पेट्रोलिंग करित असताना गोपनीय माहिती मिळाली की, गोंडेगाव कॉलरी मध्ये दोन इसम मोटर सायकलने येत असुन त्यांनी हातात धारदार तलवार बाळगली आहे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणार आहे. अशा माहितीने कन्हान पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहचले असता पोलीसा ना पाहुन दुचाकीवर मागे बसलेला अमन प्रेमदास पहाडे रा. जुने गोंडेगाव हा हातातील तलवार खाली फेकुन पळुन गेला. तर दुचाकी चालविणाऱ्या आरोपी अमित नागोराव गजभिये रा. गोंडेगाव कॉलरी यास ताब्यात घेवुन सदर घटनास्थळाहुन एक धारदार तलवार पुर्ण पणे लांबी ३ फुट ३ इंच, पितळी मुठ त्यावर अर्धचंद्रकार कोर असलेली लांबी ९ इंच स्टिलचे धार दार पाते २ फुट ६ इंच, पाते रूंदी ३ इंच किंमत १००० रूपये व एक दुचाकी जुनि वापरती बजाज कंपनीची डिस्कव्हर डी झेड एम एच ४० – एस – ७२२० किमत १५००० रू. असा एकुण १६००० रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीं विरूद्ध पोस्टे कन्हान येथे कलम ४, २५ शस्त्र अधि १९५९ महाराष्ट्र पोलिस अधि १९५१ कलम १३५ अन्वये गुन्हा नोंद केला आहे. सदरची कार्यवाही हर्ष ए पोद्दार पोलीस अधीक्षक नागपुर जिल्हा ग्रामीण, रमेश धुमाळ अपर पोलीस अधीक्षक नागपुर जिल्हा ग्रामीण यांचे मार्गदर्श नात सपोनि राहुल चव्हाण, पोहवा सचिन वेळेकर, पोना अमोन नागरे, महेश बिसने आदीने यशस्विते रित्या पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी लोकसभा निवडणुकीत एकजुटीने लढण्याची गरज - नाना पटोले

Wed Mar 27 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी – भाजपा सरकारमुळे सीमेवरील जवान व शेतात राबणारा शेतकरीही असुरक्षित. – भंडारा-गोंदियाचे उमेदवार डॉ. प्रशांत पाडोळे, चंद्रपूरमधून आ. प्रतिभा धानोरकर, गडचिरोली-चिमूर मधून डॉ. नामदेव किरसान व रामटेकमधून रश्मी बर्वे यांनी दाखल केले उमेदवारी अर्ज मुंबई :- लोकसभा निवडणूक देशासाठी अत्यंत महत्वाची आहे. मागील १० वर्षात भारतीय जनता पक्षाने देश बरबाद केला आहे. २०१९ च्या निवडणुकीवेळी पुलवामा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights