रामटेक गडमंदीर परिसरात जोडप्यास लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश..

– स्थानिक गुन्हे शाखा, नागपुर ग्रामिणची कारवाई 

नागपूर /रामटेक – रामटेक गडमंदीर परिसरात जोडप्यास लूटमार करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात.प्राप्त माहिती अनुसार दिनांक ०३/०४/२०२३ रोजी फिर्यादी नामे शुभम वासुदेव मोहनकर त्याचे होणाऱ्या पत्नीसह रामटेक मंदीर परिसरात मोटर सायकलने फिरायला गेले होते. गडमंदीर ते अंबाडा कडे जाणान्या रोड वर ते दोघेही एका ठिकाणी थांबले असताना एका होन्डा शाइन मोटर सायकलवर आलेल्या तिन अनोळखी इसमांनी फिर्यादी व त्यांचे होणाच्या पत्नीस शिवीगाळ करून मारण्याचे उसकी देवून जबरीने नगदी पैशांसह इतर साहीत्य जबरीने हिसकावून नेल्याचे फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट चरून पोलीस ठाणे रामटेक येथे अप. क्र. १४२/२३ कलम ३९२, ३४ भादवि अन्वये गुन्हा नोंदविण्यात आलेला होता. सदर घटनेपासुन स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गुन्हयाचा समांतर तपास करीत होते. तेव्हापासून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आरोपीचा शोधत होते.

तपासा दरम्यान गुन्हयातील आरोपीची गुन्हे करण्याची पद्धत वर्णनावरून अटक आरोपीवर स्थानिक गुन्हे शाखेचा संशय बळावला व मिळालेल्या गुप्त खात्रीशीर बातमीवरून गुन्हा याच आरोपीने केला असावा त्यावरून आरोपीचा शोध घेत असतांना आज दिनांक ११/०५/२०२३ रोजी आरोपी हा लाल काळया रंगाचे वेल्स चे शर्ट घातलेला होन्डा शाइन मोटर सायकलने पोलीस ठाणे कन्हान परिसरात फिरत आहे. अशा माहाती वरून पथकाने सापळा रचुन इसम नागे प्रमोद राजेद सहानी वय २३ वर्षे, रा. क्वार्टर क. ५१४, खदान क. ३. कन्हान जि. नागपुर यास थांबविले असता विचारपुस दरम्यान त्याने त्याचे साथीदार १) विक्की निशाद, रा. खदान क्र. ३ कन्हान व २) संतोष रा. इलाहबाद यांचे सह सदरचा गुन्हा केला असल्याचे सांगीतले मिळुन आलेल्या आरोपीचे तान्यातुन सदर गुन्हयातील जबरीने हिसकावून नेलेला एक हिरव्या रंगाचा रियलमी कंपनिया अँड्रॉइड मोबाईल किमती ४,०० नगदी २,०००/- व सदर गुन्हा करते वेळी वापरलेली एक काळा रंगाची लाल पट्टे असलेली होन्डा शाइन मोटर सायकल क्र एम. एच. ४० ए.ए.-४५२८ किमती ६०,०००/- असा एकुण ६६,०००/- रू चा मुद्देमाल जानी पंचनामाप्रमाणे जप्त करण्यात आलेला आहे आरोपी नामे प्रमोद राजेद सहानी याचे वर यापुर्वी जबरी चोरी व triste अनेक गुन्हे दाखल आहेत. आरोपीस जप्त मुद्देमालासह पोलीस ठाणे रामटेक यांचे ताब्यात दिले असुन पुढील तपास पोलीस ठाणे रामटेक करीत आहे.

सदरची कार्यवाही नागपुर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक  विशाल आनंद, भा.पो.से. अपर पोलीस अधीक्षक डॉ.  संदीप पखाले यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, पोलीस सपोनि राजीव कर्मलवार, हवालदार गजेंद्र चौधरी, रोशन काळे नापोशि विपीन गायधने, रोहन डाखोरे, चालक अमोल कुथे तसेच सायबर सेलचे सतिष राठोड यांचे पथकाने केली,

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com