कामठी तालुक्यात ‘प्रशासन आपल्या गावी’उपक्रम राबविणार – तहसीलदार अक्षय पोयाम

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 16 :- ग्रामीण भागातील जनतेच्या विविध विभागाच्या प्रलंबित प्रश्नांना एकाच छताखाली जलद गतीने न्याय देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी ‘प्रशासन आपल्या गावी’ हा उपक्रम ” राबविण्याचे निर्देशित केल्याप्रमाणे आज 16 सप्टेंबर ला कामठी तालुक्यातील कोराडी ग्रामपंचायत येथे तहसीलदार अक्षय पोयाम यांच्या अध्यक्षतेखाली व बीडीओ अंशुजा गराटे यांच्या मुख्य उपस्थितीत आयोजित सभेत तहसीलदार अक्षय पोयाम यांनी तालुकास्तरावरील विविध यंत्रणा अधिकारी व कर्मचारी यांनी एकत्र येऊन नागरिकांच्या विविध अडचणी /समस्या यांचे निराकरण करण्याच्या दृष्टीने मंडळ स्तरावर एक दिवस शुक्रवारी उपक्रम राबविण्या करिता व नियोजन करण्याकरिता कोराडी मंडळ अंतर्गत गावातील जि. प. सदस्य, पंचायत समिती सदस्य,सर्व विभागाचे अधिकारी,सरपंच,मंडळ अधिकारी, सचिव व तलाठी यांची बैठक घेत प्रशासन आपल्या गावी उपक्रम राबविण्याचे निर्देश तहसीलदार अक्षय पोयाम यांनी दिले.सदर सभेत गट विकास अधिकारी अंशुजा गराटे यांनी मार्गदर्शन केले व सदर उपक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व सरपंच यांना आवाहन करण्यात आले .तसेच राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा बाबत पण मार्गदर्शन करण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

सेवा पंधरवाड्यात होणार विविध विभागाच्या तक्रारीचा जलदगतीने निपटारा-तहसीलदार अक्षय पोयाम..

Sat Sep 17 , 2022
संदीप कांबळे विशेष प्रतिनिधी -नागरिकांना मिळणार सेवा,17 सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान आयोजन कामठी ता प्र 17 :- सामान्य नागरिकांचे प्रलंबित अर्ज , तक्रारी यांचा निपटारा व्हावा यासाठी जिल्हाधिकारीच्या आदेशानव्ये 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा’ कामठी तालुक्यात आयोजित करण्यात आला असून या सेवा पंधरवाड्यामध्ये विविध विभागाच्या तक्रारीचा निपटारा करून नागरिकांना शासनाच्या विविध सेवा व […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com