माउजर बाळगणा-या आरोपीस अटक ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

कन्हान – स्थानिक गुन्हे शाखेची पथक पोलीस स्टेशन कन्हान परीसरात पेट्रोलिंग करीत असताना पथकाला गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, फारुख शेख हा आपल्या जवळ अग्निशस्त्र बाळगुन आहे, अशा विश्वनीय खबरेवरुन पंचासह सदर ठिकाणी जावुन रेड केली असता, आरोपीच्या राहते घरुन घरझडती दरम्यान एक लोंखडी हॅण्डमेड देशी  बनावटीचा माउजर (कट्टा) किमती 40,000/-रु चा माल विना परवाना मिळुन आल्याने सदर नमुद आरोपी वर पोलीस स्टेशन कन्हान येथे कलम 3/25 आर्म एक्ट अन्वयें गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हयातील आरोपी नामे- फारुख अब्दुल शेख वय 24 वर्ष रा कांद्री खदान कन्हान जि नागपुर यास अटक करण्यात आली असुन पुढील तपास पोलीस स्टेशन कन्हान सहायक पेालीस निरीक्षक फुलझेले हे करीत आहे.

सदरची कार्यवाही नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, अपर पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर, यांचे आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अनिल राउत, पोलीस हवालदार विनोद काळे,ज्ञानेश्वर  राउत, अरविंद भगत, पोलीस नाईक शैलेश यादव, प्रणय बनाफर, चालक सफौ साहेबराव बहाळे यांनी यशस्वीरित्या पार पाडली

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

चैन स्नॅचिंग व दुचाकी चोरी करणारा सराईत चोरटा पोलिसांच्या ताब्यात

Tue Jun 28 , 2022
नागपुर – चैन स्नॅचिंग व दुचाकी चोरी करणारा सराईत चोरट्याला बेड्या ठोकण्यात नागपूर गुन्हे शाखेच्या युनिट क्रं 04  पोलिसांना यश आले आहे. दि 24.06.22 चे  10ः35 वा चे दरम्यान फिर्यादी नंदा चंद्रशेखर गुमगावकर वय 45 वर्ष रा. अंबानगर वृदावन लॉन, नागपुर ह्या आपल्या मदरडअेरी नावाच्या दुकानात हजर असतांना, अनोळखी आरोपी इसमाने फिर्यादी यांच्या गळ्यााात असलेल्या हारावर हाताने झटका मारून, सोन्याचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com