संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- युवा चेतना मंच द्वारा संचालित स्वामी विवेकानंद वाचनालय रनाळा येथे तनश्री रूपेश बिसणे हिचा वाणिज्य शाखेत पोरवाल महाविद्यालयातुन ९३% गुण घेऊन महाविद्यालयातुन वाणिज्य शाखेतून प्रथम आल्याबद्दल युवा चेतना मंच तर्फे सत्कार करण्यात आले. याप्रसंगी जेष्ठ नागरिक संघटनेचे मारोती ईराबत्ती , कामठी निधी अर्बन बैंक चे संचालक नितीन ठाकरे , शिक्षका नम्रता अढाऊ , दिव्याग फाऊंडेशन सचिव बाँबी महेंद्र प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रम सुत्रसंचालन प्रा.पराग सपाटे तर प्रास्ताविक भावना सपाटे तर आभार अमोल नागपूरे यांनी केली. कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता दिंव्याशु बोरकर , सौरभ चिदंबरम, रूचीता आषटणकर , अक्षय खोपे ,लक्ष्मीकांत अमृतकर, नरेश सोरते आदिनी परीश्रम घेतले.