संस्कारक्षम समाज घडविण्याच्या प्रतिज्ञेने धुलिवंदनाच्या दिवशी संपन्न झाली बीडीएसपी संघाची धम्म कार्यशाळा

नागपुर :- डाॅ. भदन्त बोधी अशोक यांच्या अध्यक्षतेखाली व बुद्ध धम्म संस्कार प्रचार व प्रसार संघाच्या (बीडीएसपी) हजारो धम्म सेवकांच्या उपस्थितीत, बेझनबाग व कुशिनगर येथील धम्म बांधवांनी धम्म आपल्या घरी अभियान अंतर्गत आयोजित केलेली ही धम्म कार्यशाळा व बालसंस्कार शिबीर नुकतेच संपन्न झाले. सर्वात प्रथम मंचावर उपस्थित डाॅ. चन्द्रशेखर मेश्राम, डाॅ. प्रशांत नानरवरे आयुक्त, सामाज कल्याण विभाग, प्रा. सरोज वाणी, डाॅ. एन. डी. पाटिल, डाॅ बाबा वाणी, डॉ. सिद्धार्थ गायकवाड, डाॅ. निरज बोधी, डाॅ. आरजु सोमकुवर, डाॅ. सिध्दार्थ कांबळे, संध्या राजुरकर, उत्तम शेवडे यांनी बुद्ध व बाबासाहेबांच्या प्रतिमेला दीप प्रज्वलित करून पुष्प अर्पित केले. जागृतीताई भैसारे, क्रितिका लाडे व नेहारिका सोनडवले यांनी स्वागत गीताने सर्वांचे स्वागत केले.

भन्ते डाॅ. बोधी अशोक यांनी उपस्थित सर्वांना त्रिसरण पंचशील दिले. आपल्या प्रास्ताविकेमध्ये डाॅ. सिध्दार्थ गायकवाड यांनी सशक्त भारत निर्मितीसाठी येथील प्रत्येक नागरिक हा शील, सदाचारी होण्यासाठी धम्माचे उपक्रम राबविण्याचे आपले ध्येय असल्याचे स्पष्ट केले. याप्रसंगी डाॅ. बालचंद्र खांडेकर सरांचा बीडीएसपी संघाकडुन त्यांचे पाली भाषा क्षेत्रातील कर्तृत्व व योगदान बघता त्यांचा गौरव करण्यात आला.

डाॅ. प्रशांत नारनवरे यांनी प्रगल्भ समाज निर्माण करण्याकरिता धम्म रूजविण्याची गरज असल्याचे सांगुन असे कार्य प्रभाविपणे राबविण्याची आवश्यकता प्रतिपादित केली.

प्रा. सरोज वाणी यांनी या पुरुष प्रधान देशात स्त्रियांना डावलल्यानेच हा देश दुराचाराच्या खाईत गेला असल्याचे प्रतिपादित केले. आता मात्र आपल्यालाच पुढाकार घ्यावे लागेल, कारण मागील कित्येक वर्षापासुन पुरुषांकडून सदाचारायुक्त देश घडविणे जमले नाही. आताही आपण त्यांच्यावरच जर अवलंबून राहिलो तर काही चांगले होईल याची अपेक्षा करणे योग्य नाही. त्यामुळेच शील सदाचारी समाज घडविण्याकरिता स्त्रियांनीच आता धम्म आपल्या कुटुंबात व समाजात रूजवावा असे सांगितले.

डाॅ. चन्द्रशेखर मेश्राम यांनी प्रतिपादन केले की स्त्रिच घराला, समाजाला व देशाला पुढे नेण्याची क्षमता ठेवते. बौद्ध धम्मा स्त्रियांना बरोबरीचे स्थान आहे. त्यांना योग्य संधी मिळाल्यास ते समाजाचा व कुटुंबाचा उद्धार करू शकतात. या कार्यशाळेत सुद्धा उपस्थितांमध्ये ८० टक्के स्त्रियाच असल्याचे त्यांनी सांगितले. स्त्रियांमध्ये असलेली प्रचंड ऊर्जा धम्म कार्याकरिता उपयोगात आणली तर समाजाचे कल्याण होईल. डाॅ. निरज बोधी यांनी उपस्थितांना पाली भाषा शिकण्याचे आवाहन करित धम्म समजण्याकरिता ही भाषा शिकणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.

डाॅ. आरजु सोमकुवर यांनी मात्र प्रबुध्द भारत निर्माणाच्या दिशेने आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करावेत असे सांगितले. डाॅ. एन. डी. पाटिल यांनी आंतरिक बदल घडुन आल्याशिवाय मनुष्यात चांगुलपणा येणे शक्य नाही त्यामुळेच सततची मनाची जागरूकता साध्य करावी हे आवर्जून सांगितले. डाॅ सिध्दार्थ कांबळे यांनी दैनिक बहुजन सौरभ लोकाभिमुख कार्य करणाऱ्यांना सहकार्य करण्यास तत्पर असल्याचे सागितले. यावेळी उत्तम शेवडे, डॉ तुळसा डोंगरे, सखाराम मंडपे, संध्या राजूरकर ह्यांनी समाजात बुद्धाच्या धम्मानुसार बंधुभाव वाढवावा असे आवाहन केले.

बाल संस्कार शिबीरामध्ये प्रशांत काळबांडे, रोशनी गायकवाड, डाॅ आरजु सोमकुवर, भन्ते चंद्रकीर्ती यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी अनेक धम्म सेवकांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यामध्ये मंदा गजभिये, कल्यानी डांगे, देवयानी गोंडोळे, बबिता टेंभूर्णे, आशा वाळके, उषा चोखांद्रे, तुषार बागडे, तागडे, वाल्मिक रामटेके आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.

बेझनबाग युनिट च्या जयश्री लाडे यांनी नियोजनबद्ध शिबिराच्या यशस्वितेकरिता विशेष प्रयत्न केलेत.

गुरूदेव लाडे यांनी सूत्र संचालन केले. प्रा.सरोज वाणी यांनी समापन गाथेने शिबीराचा शेवट केला.

या कार्यक्रमाचे यशस्वीते करिता बीडीएसपी संघाच्या बेझनबाग व कुशिनगर येथील उपासक- उपासिकांनी प्रयत्न केले. त्यात जयश्री लाडे, संजय ईंगोले, शैलेजा गेडाम, नन्दा टेंभुर्णे, कावेरी  वासनिक, मिना सोनडवले, पुनम गोलाईत, दर्शना पाटिल, राजु गेडाम, सचिन मेश्राम, गोस्वामी यांचे परिश्रम विशेष आहेत. अपेक्षा जनबंधु व प्रणाली शेन्डे यांनी आभार प्रदर्शन केले.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com