बालकांच्या संपूर्ण लसीकरणासाठी समन्वयाने कार्य करा – अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांचे निर्देश

– नियमित लसीकरण टास्क फोर्स समितीची बैठक

नागपूर :- नागपूर शहरात मनपासह इतर सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये जन्माला येणा-या बालकांचे सर्व प्रकारचे लसीकरण वेळेवर व्हावे आणि त्याचे योग्य व्यवस्थापन व्हावे, यादृष्टीने संपूर्ण यंत्रणेने समन्वयाने कार्य करावे, असे निर्देश मनपा अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी टास्क फोर्स समितीच्या बैठकीत दिले.

मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभापती सभागृहात शुक्रवारी (ता.०२) टास्क फोर्स समितीची बैठकी घेण्यात आली. याप्रसंगी मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, आरसीएच अधिकारी डॉ. सरला लाड, साथरोग अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे, जागतिक आरोग्य संघटनेचे सर्व्हेलन्स वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहम्मद साजीद, झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अतीक खान, डॉ. दीपांकर भिवगडे,डॉ. सुलभा शेंडे,डॉ. शीतल वांदिले,डॉ. जयश्री चन्ने,डॉ. गजानन पवाने, डॉ. वर्षा देवस्थळे, डॉ. ख्वाजा मोईनुद्दीन, डॉ. सुनील कांबळे, डॉ. अनुपमा मावळे, डॉ. विजय तिवारी, डॉ. भाग्यश्री गावंडे, सीडीपीओ कुंभारे, सीडीपीओ अर्पणा कोल्हे, सोनाली गावडे,  दीपाली नागरे यांच्यासह लसीकरण क्षेत्र सनियंत्रक, इतर प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.

बैठकीत अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत कोणतेही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये याची दक्षता घेत, झोननिहाय लसीकरणाची गती वाढविण्याचे तसेच सर्व झोनल आरोग्य अधिकाऱ्यांनी संबंधित भागात प्रत्यक्ष जाऊन रूग्णालयांना भेट देऊन त्वरीत निर्धारित कार्य पूर्ण करण्याचे निर्देश दिले. याशिवाय आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरणाबाबत घरोघरी जाऊन जनजागृती करावी. एएनएम आणि आशा सेविकांनी आरसीएच सर्वेक्षणाला प्राधान्य देत कामे पूर्ण करावे. झोनल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लसीकरणापासून वंचित असलेले क्षेत्र नीट ओळखून त्या भागातील बालरोगतज्ञांची मदत घेऊन लसीकरण पूर्ण करावे तसेच त्या भागात शिबीर घेण्यात यावे, महिला आरोग्य समिती गठीत करून ‘हाय रिस्क’ असलेल्या भागात लसीकरण करावे. लसीकरण कडे लक्ष द्यावे, शाळां- शाळांमध्ये जाऊन लसीकरण करण्यात यावे. एक ‘एमआर वॉर रूम’ तयार करून लसीकरणाचा आढावा घ्यावा, असे निर्देशही अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी दिले.

बैठकीत सर्वप्रथम जागतिक आरोग्य संघटनेचे सर्व्हेलन्स वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहम्मद साजीद यांनी झोननिहाय नियमित लसीकरण व्यवस्थेची माहिती सादर केली. आरसीएच अधिकारी डॉ.सरला लाड यांनी बैठकीत देण्यात आलेले निर्देश आणि त्यावरील कार्यवाहीची माहिती सादर केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

SHAURYA SANDHYA & COMBAT DISPLAY BY ARMY AT NAGPUR

Sat Feb 3 , 2024
Nagpur :- A military and combat display ‘Shaurya Sandhya’ at Mankapur Stadium of Nagpur was organised on 02 Feb 2024 under aegis of Hq Uttar Maharashtra & Gujrat Sub Area. Dy Chief Minister  Devendra Fadnavis, Chief of the Army Staff General Manoj Pande, civil invitees and military personnel graced the event, which featured Skydiving, Indian Army Daredevils, Silent Warriors (Army […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com