‘जलसुरक्षा आराखडा अंमलबजावणी’ या विषयावर तालुकास्तरीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात 

नागपूर : काटोल उपविभागीय अधिकारी कार्यालयात तालुकास्तरीय जलसुरक्षा आराखडा अंमलबजावणी या विषयावर या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन नुकतेच करण्यात आले.

तालुकास्तरीय प्रशिक्षणात योजनेची सर्वसाधारण माहिती, जल सुरक्षा आराखड्याची अंमलबजावणी प्रक्रिया, आराखड्याची रचना, प्रमुख घटक व उपाययोजना विविध संलग्न विभागातील योजनांचे सादरीकरण तसेच ग्रामस्तरावर भूजल पातळी पर्जन्यमान मोजमाप उपकरणे, पिझोमीटर, भूजल माहिती संकलन केंद्र व विविध स्तरावरील सामाजिक उपक्रम तसेच उपाययोजना याबाबत तालुकास्तरीय संलग्न विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले.

प्रशिक्षण शिबिरास उपविभागीय अधिकारी चरडे, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. वर्षा माने, प्रादेशिक उपसंचालक कार्यालयाच्या सहायक भूवैज्ञानिक ईशदया घोडेस्वार, कनिष्ठ भूवैज्ञानिक राजेश गावंडे, नंदकिशोर बोरकर, नंदकिशोर काळबांडे, तांत्रिक अधिकारी बाबा भसारकर, जल संवर्धन तज्ज्ञ दर्शन दुरबुडे, कृषीतज्ञ प्रतीक हेडाऊ, माहिती शिक्षण संवादतज्ज्ञ निलेश खंडारे, जिल्हा अंमलबजावणी भागीदार संस्थेच्या समन्वयक विषयतज्ञ ममता बालपांडे, समूह संघटक, विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कामठी नगर परिषदच्या निवडणुका लांबणीवर पडल्याने इच्छुक उमेदवार थंडावले

Fri Feb 24 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- कामठी नगर परिषदच्या नगरसेवकांचा पंचवार्षिक कार्यकाळ संपून एक वर्ष लोटला असून 12 फेब्रुवारी 2022 पासून नगर परिषद मध्ये प्रशासक राज सुरू झाले.या प्रशासक राजवटीला ही वर्षपूर्ती झाली तरीही कामठी नगर परिषद निवडणुकीचा श्रीगणेशा झालेला नाही. वास्तविकता नगर पालिका निवडणुकीचे प्रकरण बऱ्याच दिवसापासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मात्र निवडणुका होत नसल्याने कार्यकर्ते अस्वस्थ होऊन बसले […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com