नागपुरात गणेश विसर्जनासाठी झोननिहाय ३५० कृत्रिम तलाव.

नागपूर – उदयापासून सुरू होणा-या गणेशउत्सवानिमीत्त, नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरात झोननिहाय गणेशविसर्जनासाठी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी गणेशमूर्तीचे विसर्जन आपल्या परिसरातील कृत्रिम तलावातच करावे असे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे; यंदा गणेश विसर्जनासाठी ३५० कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. शहरात झोननिहाय विविध भागात, कृत्रिम तलावाची व्यवस्था केली आहे. तसेच चौकाचौकात व मैदानात कृत्रिम तलाव लावण्यात येणार आहेत. शहरातील फुटाळा, सोनेगाव, सक्करदरा आणि गांधीसागर या प्रमुख तलावासोबतच अन्य तलावावर लोखंडी टँकची व्यवस्था करण्यात येणार आहे. कृत्रिम तलावाच्या ठिकाणी विसर्जनासोबतच निर्माल्य संकलनासाठी कलश ठेवण्यात आले आहेत. मनपाचे कर्मचारी व स्वयंसेवक निर्माल्य संकलन करणार आहेत. कृत्रिम तलावाच्या ठिकाणी मजबूत लोखंडी बॅरिकेटिंग करण्यात येईल. याशिवाय विसर्जन परिसरात हायमास्ट लाइट लागतील. जागोजागी निर्माल्य कलश ठेवण्यात येतील.

झोननिहाय कृत्रिम तलावाची संख्या

लक्ष्मीनगर- ३४

धरमपेठ- ६३

हनुमाननगर – ४४

धंतोली- ३६

नेहरूनगर – ४४

गांधीबाग- ३८

सतरंजीपुरा- २६

लकडगंज- २०

आशीनगर – १३

मंगळवारी- ३२

अशी आहे कृत्रिम तलावाची व्यवस्था

लक्ष्मीनगर झोन

अजनी चौक राजीव गांधी पुतळ्याजवळ, धंतोली बगीचा, व्हॉलिबॉल मैदान पूर्व लक्ष्मीनगर, उज्ज्वलनगर दुर्गा मैदान, छत्रपतीनगर, हनुमान मंदिर, सोनेगाव तलावाजवळ, एमआयजी त्रिमूर्तीनगर, एनआयटी कॉलनी, प्रतापनगर, स्केटिंग ग्राऊंड, आॅर्बिटल वसाहत एकात्मतानगर जयताळा, राजेंद्रनगर मैदान

धरमपेठ झोन

धाबा हनुमान मंदिर, नीम पार्क फ्रेंड्स कॉलनी, अंबाझरी ओव्हर फ्लोर, फुटाळा तलाव ग्राऊंड, रामनगर नीट, माधवनगर, टिळकनगर ग्राऊंड, रविनगर वसाहत, रामदासपेठ लेंड्रा पार्क, किरणनगर ग्राऊंड, विष्णू की रसोई, शिवाजीनगर सभागृह, चिल्ड्रन पार्क, यशवंत स्टेडियम.

हनुमाननगर झोन

म्हाळगीनगर मनपा शाळा, नंदलाल साहू सांस्कृतिक सभागृहजवळ, नासरे सभागृहाच्या मागे, नरसाळा, संभाजीनगर पाण्याची टाकी, तुकडोजी चौक, राजीव गांधी पार्क, कांबळे यांच्या घराजवळ कबड्डी मैदान गणेशनगर, रेशीमबाग ,चंदननगर राममंदिर, सिद्धेश्वर सभागृह, मानेवाडा चौक, लाडीकर ले-आऊट, अयोध्यानगर साईमंदिर, गजानन शाळेजवळ, मानेवाडा चौक, अभयनगर, रिंग रोड लव-कुशनगर, हुडकेश्वर पोलीस स्टेशन रोड, उदयनगर चौक.

धंतोली झोन

आग्याराम देवी चौक, बालभवन पार्क आतमध्ये, मॉडेल मिल चौक, गणपती मंदिर गांधीसागर तलावाच्या बाजूला, झुलेलाल मंदिराच्या आतमध्ये, गरम पाणी रोड झुंबरजवळ, अजनी पोलीस स्टेशन, मानवता शाळेजवळ, भगवाननगर, बालाजीनगर, रामकृष्ण सोसायटी समाजभवन, महाजन आटा चक्की, चिचभवन कॉर्पोरेशन शाळेजवळ

नेहरूनगर झोन

दामोदर लॉन खरबी रोड, चैतन्येश्वर रोड नागोबा मंदिर, मनपा शाळा वाठोडा, संघर्षनगर शीतला माता मंदिर, वूमन्स कॉलेज, गुरुदेवनगर बगीचा, सद्भावनानगर, शंकर मूर्ती नंदनवन, किशोर कुमेरिया यांच्या आॅफिसजवळ, रेखा साकोरे यांच्या आॅफिसजवळ, सहकारनगर,

योगेश्वरनगर, कीर्तीनगर महाकाळकर कॉम्प्लेक्स, सक्करदरा लेक गार्डन, सक्करदरा तलावाजवळ, बॉलिवूड सेंटर पॉर्इंट, महाकाळकर सभागृह, आशीर्वादनगर.

गांधीबाग झोन

काशीबाई देऊळ संत गुलाबबाबा, हेडगेवार यांच्या घराजवळ, शिवाजी पुतळा गडकरी वाड्यासमोर, भोसले विहार कॉलनी, टिळक पुतळ्याजवळ, चिटणवीसपुरा शाळेजवळ, चिटणीस पार्कजवळ, गांधीबाग उद्यानाजवळ, गंगोत्री बार हॉटेलजवळ, लाल शाळेजवळ गीतांजली, मारवाडी चाल, गांधीबाग भावसार चौक, इतवारी होलसेल मार्केट, चंद्रहास बीअर बारजवळ लाकडी पुलाजवळ, हनुमान चौक.

सतरंजीपुरा झोन

मंगळवारी तलाव परिसर

नाईक तलाव परिसर

लकडगंज झोन

तुकारामनगर हनुमान मंदिर नगर चौक गोतमारे यांच्या घराजवळ कळमना, तलमले ले-आऊट, नेताजी सुभाषचंद्र बोस शाळेमागे, प्रजापतीनगर, सरदार पटेल ग्राऊंड, फुले समाजभवन हिवरीनगर, शिवमंदिर हिवरीनगर, व्यंकटेश कॉलनी, आरटीओ मैदान डिप्टी सिग्नल, सूर्यनगर हनुमान मंदिर, सुभाषनगर पवनसूत हनुमान मंदिर, अण्णा भाऊ साठे मैदान, मानकर वाडी, लाल शाळा पारडी.

आशीनगर झोन

समतानगर नाल्याच्या पुलाजवळ, बारुद कंपनी मंदिरजवळ नांदेड सहयोगनगर, विनोबा भावेनगर, शिवाजी चौक यशोधरानगर शीतला माता मंदिर महेंद्रनगर, महर्षी दयानंद पार्क, बुद्ध पार्क, गुरू नानक पुरा बगीच्याजवळ.

मंगळवारी झोन

सिंधूनगर सोसायटी जरीपटका,आंबेडकर पार्क अमरज्योतीनगर, नारा गाव, पोलीस लाईन टाकळी तलाव, राठी मैदान झिंगाबाई टाकळी, गोरेवाडा तलाव.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

नवीन कामठी पोलिसांनी दिले 61 गोवंश जनावरांना जीवनदान..

Tue Aug 30 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र 7 वरील सोनू मोनू कंपनिसमोरून 10 चाकी कंटेनर क्र एम पी 04 एच ई 9664 ने अवैधरित्या 61 गोवंश जनावरे कत्तलीसाठी वाहून नेत असता सापळा रचून बसलेल्या नवीन कामठी पोलिसांनी वेळीच धाड घालून सदर कंटेनर ताब्यात घेऊन कत्तलीसाठी कत्तलखान्यात वाहून नेत असलेले […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com