ताकतिने प्रतिकार करून आरोपीच्या तावडीतून पळाली

– पाणी पिण्याच्या बहाण्याने घुसला घरात,आरोपीच्या शोधासाठी 70 सीसीटीव्ही फुटेज तपासले

नागपूर :- पाणी पिण्याच्या बहाणाकरीता तो तिच्या घरात घुसला. तिला दोन्ही हातानी पकडले. मात्र, संपूर्ण ताकतिने प्रतिकार करीत ती त्याच्या तावडीतून पळाली. पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी जवळपास 70 सीसीटीव्ही तपासले आणि त्याच्या मुसक्या आवळल्या. या घटनेमुळे परिसरातील भीतीचे वातावरण पसरले आहे.

भोला नाने (25) रा. मस्कासाथ असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपी भोला दुचाकीने वस्ती वस्ती झिंगे विकतो. पीडित 19 वर्षाची मुलीचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे. तिच्या घरी किराणा दुकान आहे. घटनेच्या वेळी ती एकटीच दुकानात होती. तिचे वडिल बाजारात गेले होते तर आई बाहेर गेली होती.

दरम्यान आरोपी झिंगे विकण्यासाठी वस्तीत गेला. पीडित तरुणीला दुकानात एकटी पाहून तिथे थांबला. जुनी ओळख आहे, असे भासवून त्याने विचारपूस केली. आई बाबा कुठे गेले. ओळखीचा वाटतो म्हणून तिनेही सहज माहिती दिली. घरी कोणीच नाही, याची त्याला खात्री पटली. दुचाकी पीडितेच्या घरासमोर ठेवली आणि पाणी मागितले. ती पाणी आणण्यासाठी किचनमध्ये गेली असता तोही तिच्या मागे गेला आणि तिला घट्ट पकडले. बेडवर लोटवले असता तिने संपूर्ण ताकतिने प्रतिकार करीत पळाली. तोही तिच्या मागे धावला. पुन्हा तिला पकडले, पुन्हा ती त्याच्या तावडीतून सुटली आणि घराच्या छतावर गेली आणि वरचा दार लावून घेतला. भयभीत झालेल्या तरूणीच्या तोंडातून शब्दही बाहेर पडत नव्हते. आरोपी गेल्याची खात्री पटल्यावर ती खाली आली. काही वेळानंतर आई वडिलही घरी आले. तिने झालेला सारा प्रकार सांगितला. त्यांनी पोलिस ठाणे गाठून तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

असा घेतला शोध

पोलिस उपायुक्त निकेतन कदम यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता आरोपीचा शोध घेण्याचे निर्देश दिले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर यांच्या मार्गदर्शनात सपोनि व्ही.व्ही. मोटे, मेघा गोखरे, राहूल राठोड, गणेश गुप्ता, रामेश्वर गेडाम, अक्षय कुलसंगे, किशोर धोटे, मनीष झरकर यांच्या पथकाने परिसरातील जवळपास 70 सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच गोपनिय माहिती घेतली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने आरोपीला अटक केली. पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपुर में एक के बाद एक 6 चैन स्नैचिंग के बाद 900 किमी गए बाईक पर, पुलिस ने उडीसा जाकर किया था गिरफ्तार

Wed Apr 3 , 2024
नागपुर :- पिछले सप्ताह गुरुवार को नागपुर में एक के बाद एक 6 चैन स्नैचिंग के बाद इरानी गैंग के दो सदस्य बाईक से 900 किमी. की यात्रा कर अपने गांव पहुंचे थे. दो मुख्य अभियुक्त जफर अली भोलु अली और जहीर हुसैन मो. बिहारी (दोनों 19 वर्ष) को क्राईंम ब्रांच पुलिस ने उडीसा- छत्तीसगढ बार्डर पर खरिया रोड से […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com