क्रिकेटपटू केदार जाधव वर शिस्तभंगाची कारवाई करा – हेमंत पाटील

मुंबई :- कौटुंबिक कारण देत मध्येच सामना सोडून जाणाऱ्या क्रिकेटपटू केदार जाधव वर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शनिवारी इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केली.जाधव संदर्भात बीसीआयकडे तक्रार करणार असल्याचे देखील पाटील म्हणाले.खेळाडू कितीही मोठा असला तरी त्याने सामना समितीच्या नियमानुसार तसेच खेळाडूवृत्तीने वागले पाहिजे.अन्यथा क्रिकेट सोडून घरी बसावे, असा सूचक सल्ला पाटील यांनी केदार जाधवला दिला आहे.

केदारचे हे वागणे म्हणजे ‘क्रिेकेटच्या भरवश्यावर मोठे होणे आणि त्याच खेळाला लाथा मारण्यासारखे’ आहे. उन्मात करून पैशांच्या जोरावर काहीही करणे योग्य नाही. आतापर्यंत केदार यांनी अनेक चुका केल्या आता, त्यांच्या चुकांना माफ केले जाणार नाही, संतप्त प्रतिक्रिया पाटील यांनी व्यक्त केली.

रणजी ट्रॉफीमध्ये केदार महाराष्ट्राचा टीम मध्ये आहे.पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर महाराष्ट्र विरुद्ध तामीळनाडू असा रणजी ट्रॉफीचा सामना खेळवला गेला होता.पंरतु, या सामन्यादरम्यान केदार कौटुंबिक कारण देत सामना अर्धवट सोडून निघनू गेला होता. पंरतु, यानंतर तो महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांच्यासोबत दिसला.रोहित पवार यांनी बोलावलेल्या एमसीएच्या बैठतीत केदारने हजेरी लावली होती. हा शिस्तभंग असून त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी पाटील यांनी केली.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com