स्वीप” कार्यक्रमांतर्गत मनपा मुख्यालयात महिलांनी घेतली मतदार जनजागृती प्रतिज्ञा

नागपूर :- सिस्टिमेटिक व्होटर्स एज्यूकेशन अँड इलेक्ट्रॉल पार्टीसिपेशन अर्थात ‘स्वीप’ कार्यक्रमांतर्गत नागपूर महानगरपालिका मुख्यालय येथे मतदार नोंदणीसाठी जनजागृती करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीच्या दालनात सोमवारी (ता.१८) शेकडोंच्या संख्येत महिलांनी ‘मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीने प्रतिज्ञा घेतली.

कार्यक्रमात मनपाचे उपायुक्त निर्भय जैन, महेश धामेचा, उपायुक्त तथा समाजकल्याण अधिकारी डॉ. रंजना लाडे, कार्यकारी अभियंता अल्पना पाटणे, शिक्षणाधिकारी साधना सयाम, स.प्र.वि.चे सहायक अधीक्षक राजकुमार मेश्राम, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांचासह मुख्यालयात कार्यकर्त सर्व महिला कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

सर्वप्रथम उपायुक्त महेश धामेचा यांनी “स्वीप” कार्यक्रमांची माहिती दिली. यावेळी महेश धामेचा म्हणाले की, सर्वात मोठ्या लोकशाही असणाऱ्या भारत देशात लोकशाहीचे पर्व सुरु होत आहे, अशात सर्वांनी आपला हक्क आणि कर्तव्याचे पालन करायला हवे, लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपुरातील मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे, यावेळी लोकसभा मतदारसंघामध्ये ७५ टक्के पेक्षा अधिक मतदानाचे ध्येय ठेवण्यात आले असून, यासाठी “मिशन डिस्टिंगशन” सर्व मतदारांच्या सहभागातून यशस्वीपणे राबविण्यात येणार आहे. यात आपणही सहभगी व्हावे, सर्वांनी मतदान करण्याचा संकल्प करावा आणि इतरांना देखील मतदानासाठी प्रेरित करावे असे आवाहन धामेचा यांनी केले.

कार्यक्रमात उपायुक्त तथा समाजकल्याण अधिकारी डॉ. रंजना लाडे यांनी उपस्थितांना ‘मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीने प्रतिज्ञा दिली. तसेच मुख्यालयात लावण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटवर सेल्फी काढत ‘आम्ही ही ‘स्वीप’ मतदान साक्षरता कार्यक्रमाच्या माध्यमातून जनजागृती करू अशी ग्वाही उपस्थितांनी दिली.

याशिवाय मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात ‘स्वीप’ मतदान साक्षरता कार्यक्रमाच्या माध्यमातून मनपाच्या लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, धंतोली, नेहरूनगर, गांधीबाग, सतरंजीपुरा, लकडगंज, आशीनगर आणि मंगळवारी या सर्व झोन कार्यालयामार्फत मतदार जनजागृती करण्यात येत आहे. निवडणूक सहभागाच्या महत्त्वाविषयी जागरुकता निर्माण करणे, महिलांना निवडणूक प्रक्रियेत सक्षम करणे याकरिता मनपाच्या विविध शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मतदार जनजागृती रॅली काढण्यात येत आहेत. नागपूर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाद्वारे विविध शाळांमध्ये मतदार जनजागृती संदर्भात निबंध, चित्रकला स्पर्धा घेण्यात येत आहेत. याशिवाय रॅली बॅनर व सेल्फी पॉईंट देखील शाळांमध्ये उभारण्यात आले आहेत, तसेच पथनाट्यच्या सहायाने नागरिकांनी परिसरात लागलेल्या सेल्फी पॉईंटवर सेल्फी काढून मतदार असल्याबद्दल अभिमान व्यक्त करावा यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. एकूणच शहरात आयोजित विविध समारंभ, अभियान यांच्या माध्यमातून सर्वत्र मतदानाप्रति जागृतीचा जागर करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

लष्करी प्रशिक्षणादरम्यान वैद्यकीय कारणावरून अपात्र ठरलेल्या कॅडेट्सना पुनर्वसन सुविधा देण्यास संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची एक विशेष बाब म्हणून मंजुरी

Mon Mar 18 , 2024
– पुनर्वसन महासंचालनालयाकडून चालवल्या जाणाऱ्या योजनांचे लाभ या कॅडेट्सना देण्यात येणार नवी दिल्ली :- लष्करी प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणामुळे निर्माण होऊ शकणाऱ्या/जास्त वाढ होऊ शकणाऱ्या तंदुरुस्तीविषयक समस्यांमुळे वैद्यकीय कारणांवरून अपात्र ठरणाऱ्या कॅडेट्सना पुनर्वसन सुविधा देण्याच्या प्रस्तावाला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मंजुरी दिली आहे. सशस्त्र दलांमध्ये अधिकारी म्हणून दाखल होण्याच्या हेतूने कॅडेट्स अगदी तरुण वयात लष्करी अकादमींमध्ये प्रवेश घेत असतात आणि गणवेशात देशाची […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights