संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
-1 जुलै पासून प्लास्टीक वापरावर पूर्ण बंदी
कामठी ता प्र 24 :- शासनाच्या अधिसूचनेनुसार प्लास्टिकचे एकल उत्पादन , वापर, आयात,साठवणूक , वितरण, विक्री आणि वापरावर 1 जुलै पासून संपूर्ण भारतात बंदी घालण्यात आली आहे. या पाश्वरभूमीवर कामठी शहरात सुद्धा प्लास्टिक बंदी करण्यात आली आहे.यानुसार 120 मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक वापरास मनाई करण्यात आली असून या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध 25 हजार रुपये दंड व तीन महिने कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.तेव्हा नागरिकानो शासनाच्या आदेशाचे पालन करून प्लास्टिक बंदीस सहकार्य करा अन्यथा खबरदार…!प्लास्टिक वापराल तर आता थेट कारावास होणार असल्याची माहिती कामठी नगर परिषद चे मुख्याधिकारी संदीप बोरकर यांनी प्रस्तुत प्रतिनिधिला दिली आहे.
खबरदार…! प्लास्टिक वापराल तर आता थेट करावास होणार-मुख्याधिकारी संदीप बोरकर
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com