स्वच्छ भारत अभियान : शोध पथकाची कारवाई

नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवार (ता.06) 6 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 50 हजार रुपयांचा दंड वसूल केला.

धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. एशियन किडनी हॉस्पीटल, धरमपेठ, नागपूर व मे. प्रकृती हॉस्पीटल, दाभा रिंग रोड, नागपूर यांच्यावर सामान्य कचऱ्यासह जैव कचरा आढळून आल्याबद्दल कारवाई करून प्रत्येकी 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.तसेच ड्रिम ओरा, गांधीनगर, नागपूर यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

धंतोली झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. ऐ. के. गांधी इलेक्ट्रीकल, उंटखाना चौक, नागपूर यांच्यावर दुकानातील कचरा मोठ्या प्रमाणात रस्त्यालगत पसरविल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच बालाजी भोजनालय, एस.टी. बस स्टँड जवळ, गणेशपेठ, नागपूर यांच्यावर रेस्टॉरंटच्या सांडपाण्याद्वारे चेंबर ब्लॉकेज होत असल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.लकडगंज झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. मोहिनी दृष्टी डेव्हलपर्स प्रा. लि. सुर्या नगर, नागपूर यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

लाइज़ोल के #NoMoreHalfTruths कैम्पेन ने फिनायल से जुड़े मिथकों को तोड़ा, सोशल मीडिया पर इसे बड़े पैमाने पर मिली लोकप्रियता और इसे 800 मिलियन से अधिक बार देखा गया

Fri Jul 7 , 2023
– लाइज़ोल ने अपने उत्पादों से स्कूल एवं रसोई के फर्श की सफाई में मदद करने के लिए अक्षय पात्र फाउंडेशन के साथ साझेदारी की है मुंबई :- बीते कई दशकों से, भारतीय उपभोक्ता यह मानते रहे हैं कि फिनाइल अत्यधिक प्रभावी फर्श क्लीनर हैं। लेकिन अध्ययनों से पता चला है कि साधारण फिनाइल पोछा लगाने पर केवल 50% कीटाणुओं […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!