नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी (ता.13) 7 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 50 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 1 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 10,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 5 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल धरमपेठ झोन अंतर्गत प्रभाग न.15, टेकडी लाईन,सिताबर्डी येथील हरिओम ट्रेडर्स या दुकानाविरुध्द कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच यांच्या विरुधात दुस-यांदा कारवाई करण्यात आली.त्याचप्रमाणे लक्ष्मीनगर झोन अंतर्गत प्रतापनगर येथील सिदेश अपार्टमेन्ट यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.धंतोली झोन अंतर्गत उंटखाना चौक येथील प्रवीण बाडबुचे यांच्याविरुध्द रस्त्यालगत मोकळया जागेवर मोठया प्रमाणात कचरा जाळल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. नेहरुनगर झोन अंतर्गत अमोल नगर, वाठोडा येथील M/s Triveni Heights यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. गांधीबाग झोन अंतर्गत प्रभाग न. 22, निकालस मंदीर जवळ, इतवारी येथील M/s Wisdom Quality Education यांच्याविरुध्द विद्युत खांबावर विना परवानगीने डिस्प्ले बॅनर / होर्डिग्ज लावल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सतरंजीपूरा झोन अंतर्गत तांडापेठ येथील शेख सत्तार यांच्याविरुध्द दुकानातील कचरा रस्त्यालगत पसरविल्याबद्दल आणि आजु-बाजुचा परिसर घाण केल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मंगळवारी झोन अंतर्गत सदर येथील M/s Inara Appartment यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
स्वच्छ भारत अभियान : प्लास्टिक विरुध्द मनपाची धडक कारवाई
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com