ठाकरे गटाबरोबर वाजलं, पण शरद पवार गटाला समर्थन; ‘या’ जागेवरून वंचितची माघार

मुंबई :- आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली जात आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीत ही लढत होणार असून घटकपक्षांमुळे मतभेद निर्माण झाले आहेत. वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीतून काढता पाय घेतला आहे. त्यामुळे वंचितनेही उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. परंतु, स्वतंत्र लढत असले तरीही त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला पाठिंबा दर्शवला आहे. सुप्रिया सुळे यांनी यासंदर्भात एक्सवरून माहिती दिली आहे.

वंचित बहुजन आघाडीने गेल्यावर्षी ठाकरे गटाबरोबर युती जाहीर केली. त्यामुळे ते महाविकास आघाडीत जाणार असल्याचीही चर्चा होती. परंतु, इतर घटकपक्षातील मतभेदामुळे महाविकास आघाडीतील त्यांचा मार्ग खडतर होता. परंतु, हे मतभेद दूर सारून त्यांनी महाविकास आघाडीत घेण्यात आले होते. परंतु, कालांतराने ठाकरे गटाबरोबर त्यांचं फिस्कटल्याने प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीतून माघार घेतली. परिणामी आता महाराष्ट्रात तिहेरी लढत होणार आहे. दरम्यान, ठाकरे गटाविरोधात उभे राहिलेले प्रकाश आंबेडकरांनी मात्र राष्ट्रवादीला पाठिंबा दर्शवला आहे.

वंचितने जाहीर केली यादी

वंचित बहुजन आघाडीने आघाडीने अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन उमेदवारांची घोषणा केली. यामध्ये अविनाश भोसिकर-नांदेड (लिंगायत), बाबासाहेब भुजंगराव उगले-परभणी (मराठा), अफ्सर खान-छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) (मुस्लिम), वसंत मोरे-पुणे (मराठा), मंगलदास बांदल-शिरुर (मराठा), या पाच उमेदवारांची यादी ट्विटरवरुन जाहीर केली आहे.

– फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मोदी- शाह विदर्भात, 10 रोजी रामटेक, 14 रोजी चंद्रपुरात सभा

Wed Apr 3 , 2024
मुंबई :- लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघात मतदान होत असल्याने येथे भाजपाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सभांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार येत्या 10 एप्रिलला नरेंद्र मोदी रामटेक येथे पहिली जाहीर सभा घेणार आहेत. त्यानंतर 14 एप्रिलला दीक्षाभूमी येथे दर्शन आणि चंद्रपूर येथे जाहीर सभा प्रस्तावित आहे, तर शाह […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com