स्वच्छ भारत अभियान : प्लास्टिक विरुध्द मनपाची धडक कारवाई

नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी (ता.6) 3 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 15 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात धरमपेठ आणि सतरंजीपूरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 2 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 10,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 3 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल धरमपेठ झोन अंतर्गत रामनगर चौक येथील मोहन वेजिटेबल शॉप या दुकानाविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सतरंजीपूरा झोन अंतर्गत नाईक तलाव, बांगलादेश, इतवारी येथील न्यू लक्ष्मी स्वीटस या दुकानाविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.त्याचप्रमाणे गांधीबाग झोन अंतर्गत क्वेटा कॉलोनी, टेलिफोन एक्स्चेंज चौक येथील गावंडे कोचिंग क्लासेस यांच्याविरुध्द विनापरवानगीने विद्युत खांबावर डिस्प्ले बॅनर आणि होर्डिंग लावल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कोराडी मे मनाया भाजपा का स्थापना दिवस

Fri Apr 7 , 2023
कोराडी :- भारतीय जनता पार्टी के प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले के जनसंपर्क हाल मे भाजपा का स्थापना दिवस मनाया गया।कार्यक्रम मंच पर भाजपा नेता अनिल निधान,भाजपा के युवा नेता संकेत बावनकुले,महादुला के नगराध्यक्ष राजेश रंगारी, सुभाष भात्रा, कोराडी के सरपंच नरेंद्र धांधली,उप सरपंच आशिष राऊत,सभापतिद्धय स्वप्निल थोटे, पंकज ढोणे, पार्षद महेश धुडस, इत्यादि प्रमुखता से उपस्थित थे। इस मौके पर केन्द्र […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com