निवडणुक निरीक्षक पराशर यांचेकडून निवडणूक व्यवस्थेची पाहणी, स्ट्राँग रुम, इव्हीएम साठवणूक कक्ष व मतदान केंद्रांना भेट

गडचिरोली :- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकिच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने निवडणूक यंत्रणा सज्ज ठेवली आहे. या व्यवस्थेची पाहणी करण्याकरीता निवडणूक निरीक्षक अनिमेष कुमार पराशर यांनी आज येथील स्ट्राँग रुम, इव्हीएम साठवणूक कक्ष व मतदान केद्रांना भेट दिली.

12-गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक 19 एप्रिल 2024 रोजी होत आहे. यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज आहेत. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात निवडणुकीसंदर्भात चोख व्यवस्था करण्यात आली आहे. या अनुषंगाने पराशर यांनी कृषी महाविद्यालय येथील स्ट्राँग रुमची पाहणी करून आढावा घेतला. यावेळी सहायक निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राहुल मीना, कार्यकारी अभियंता सुरेश साखरवडे व इतर अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

निवडणुक निरीक्षक पराशर यांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे स्ट्राँगरूममध्ये सर्व व्यवस्था आहे का याबाबत पाहणी केली. तसेच विद्युत शॉर्ट सर्कीटमुळे मतदानयंत्रांना हानी होऊ नये याची दक्षता घेण्यासाठी या कक्षातील व गॅलरीतील तसेच लगतच्या इतर कक्षातील विद्युत पुरवठा बंद करण्याच्या सूचना दिल्या. त्यांनी सीसीटीवी यंत्रणा, अग्नीरोधक यंत्रणा, डबल-लॉक सिस्टीम व परिसरातील सुरक्षा यंत्रणेची पाहणी केली. स्ट्राँगरुम म्हणून निवड केलेल्या कृषी महाविद्यालयाचा परिसर त्रिस्तरीय बॅरिकेट लावून सुरक्षीत करण्याचे त्यांनी सांगितले.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील इव्हीएम साठवणूक कक्षाला  पराशर यांनी भेट देवून तेथील सुरक्षा यंत्रणेचा आढावा घेतला. याठिकाणी सिसिटीव्ही, सुरक्षा अलार्म, अग्निशामक यंत्रणा व पुरेसे विद्युत दिवे आहेत का याबाबत पाहणी केली. तसेच इव्हीम साठवणूक कक्षाला भेट देणाऱ्यांच्या नोंदी अभ्यागत नोंदवहीत नोंदविल्या जातात का याबाबत विचारणा करून नोंदवहीची तपासणीही केली.

पराशर यांनी एलआयसी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नगर परिषद प्राथमिक शाळा, पंचायत समिती परिसर व रामनगर येथील पीएम जवाहरलाल नेहरू उच्च प्राथमिक शाळा या मतदान केद्रांची पाहणी केली. मतदान केंद्रावर स्वच्छतेसह इतर सर्व आवश्यक सुविधेसोबतच उन्हापासून बचावासाठी शेड व पिण्याच्या पाणी या दोन सुविधा प्रामुख्याने उपलब्ध ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील खर्च निरीक्षण कक्षालाही त्यांनी भेट देवून तेथील नोंदवह्यांची पाहणी केली.

सहायक निवडणूक अधिकारी मीना यांनी निवडणूक निरीक्षक पराशर यांना जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विद्यार्थ्यांनी पालकांना दिले मतदानासाठी संकल्पपत्र

Tue Apr 2 , 2024
– स्वीप अंतर्गत मनपा शाळांचा उपक्रम   चंद्रपूर :- प्रत्येक बालक हा त्यांच्या पालकाचा लाडका असतो,त्यामुळे त्याच्या आग्रहाला किंवा आवाहनाला पालक संमती देतातच,हे लक्षात घेऊन येत्या लोकसभा सार्वत्रीक निवडणुक 2024 अंतर्गत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांद्वारे संकल्पपत्र भरून घेतले जात आहे.यातील संदेशानुसार विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडिलांना पत्र लिहुन निवडणुकीमध्ये मतदान करण्याचे आवाहन केले आहे. निवडणुकीत प्रत्येक मतदाराने मतदान करून […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights