स्वच्छ भारत अभियान : प्लास्टिक विरुध्द मनपाची कारवाई

नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी (ता.1) 3 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 60 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात गांधीबाग आणि सतरंजीपूरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 2 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 10,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 5 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल गांधीबाग झोन अंतर्गत क्वेटा कॉलनी येथील अनिल ट्रेडर्स यांच्याविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सतरंजीपूरा झोन अंतर्गत गांजाखेत, इतवारी येथील दुरकर किराणा शॉप या दुकानाविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.त्याचप्रमाणे धंतोली झोन अंतर्गत जय हिंद सोसायटी, मनीष नगर येथील साई क्लीनिक यांच्याविरुध्द जैव-वैदयकीय कचरा सामान्य कच-यासोबत पसरविल्याबद्दल कारवाई करून 50 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मविआमुळेच प्रकल्प हातचे गेले, मविआ दोषी ; भाजयुमोचे नागपुरात आक्रामक आंदोलन.

Wed Nov 2 , 2022
नागपूर – महाविकास आघाडीच्या काळातच महाराष्ट्राच्या बाहेर गेलेले प्रकल्प शिंदे-फडणवीस सरकारमुळे राज्याबाहेर गेल्याचे सांगुन संभ्रम निर्माण करणाऱ्या महाविकास आघाडीचा जाहीर निषेध आज भाजयुमो नागपुर महानगराकडुन आय.टी. पार्क, चौक, नागपुर येथे आक्रामक आंदोलन करून करण्यात आला. यावेळी भाजयुमोकडुन महाविकास आघाडीचा पुतळा फुंकुन तीव्र निषेध व्यक्त केला. वेदान्त फॅाक्सकॅान, टाटा एअरबस, सॅफरॅानसह अन्य प्रकल्प राज्यातून गुजरातमध्ये नेण्यात येत आहेत असे अतिशय खोटे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!