-मद्य तस्कर पोलिसांच्या जाळ्यात
-लोहमार्ग पोलिसांची धडाकेबाज कारवाई
नागपूर :-पोलिसांना पाहताच त्याचे हावभाव बदलले, त्याच्या हालचाली संशयास्पद होत्या. कर्तव्यावर असलेले लोहमार्ग पोलिसांना लहानसा सुगावा महत्वाचा ठरला. त्याआधारे विचारपूस केली असता त्यांच्या शब्दात धार नव्हती आणि मद्द तस्करी उघडकीस आणण्यात उशिर लागला नाही. नयन गुंड (25) आणि महेश पुरी (18), दोन्ही रा. हिंगणघाट असे मद्य तस्करांची नावे आहेत.
अंमली पदार्थाच्या तस्करीवर आळा घालण्यासाठी पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांच्या आदेशाने एक विशेष पथक तयार करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास कानपिल्लेवार यांच्या नेतृत्वातील पथकात उपनिरीक्षक प्रवीण भिमटे, हेड कॉनस्टेबल महेंद्र मानकर, विनोद खोब्रागडे, नितीन शेंडे, चंद्रशेखर मदणकर, मंगेश तितरमारे, गिरीश राउत यांचा समावेश आहे.
पथकातील सदस्य बल्लारशाह-वर्धा मेमू पॅसेंजरमध्ये पेट्रोलिंग करीत असताना नयन आणि महेश हे दोघेही संशयास्पद वाटले. पोलिसांना पाहताच त्यांच्या हालचाली वाढल्या तसेच चेहर्यावरील रंग उडाला. त्यांची लगबग आणि धावपळ महेंद्र मानकर यांनी टिपली आणि त्याच्यावर पाळत ठेवली. दोघेही नजर चुकवत असल्याने मानकर यांचा संशय बळावला. दोघांनाही ताब्यात घेवून विचारपूस केली असता त्यांना भीतीमुळे त्यांना सांगताही जमत नव्हते. त्यामुळे खात्री पटली. त्यांच्या जवळील काळ्या रंगाची कॉलेज बॅगची झडती घेतली असता त्यात 16 हजार 470 रुपये किंमतीची देशी विदेशी दारूच्या बाटल्या मिळून आल्या. मध्यप्रदेशातून खरेदी केलेली दारू बंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात विक्रीसाठी नेत असल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या विरूध्द गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली.
ओरीजनल बाटलीत बनावट दारू
नामांकित कंपन्यांच्या बाटलीत बनावट दारू ची विक्री करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळल्या जाते. अशा प्रकारची दारू स्वस्त मिळते. आध्र प्रदेशातील अकला रेडड्ी याच्याकडे दोन पिशव्या होत्या. दोन्ही पिशव्या एस-4 डब्यातील 55 आणि 56 नंबरच्या बर्थखाली ठेवल्या होत्या. तो अंदमान एक्सप्रेसने न्यु दिल्ली ते बापटला (आध्रप्रदेश) असा प्रवास करीत होता. त्याच्याकडून 31 हजार 400 रुपये किंमतीची विदेशी दारूची तस्करी पकडली.