आरोग्य शिबीर हा अतिशय चांगला उपक्रम-आमदार सावरकर

संदीप कांबळे, कामठी
-आयुष्यमान कार्ड हे आरोग्यदायी एटीएम
कामठी ता प्र 20:- गोरगरीब व सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी केंद्र सरकारने आयुष्यमान भारत योजना सुरू केली.ही योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी लाभदायक ठरत असून आयुष्यमान कार्ड म्हणजे आरोग्यदायी एटीएम होय तसेच आयुष्यमान भारत योजने अंतर्गत रुग्णांना पाच लाख रुपया पर्यंत साहाय्य केले जाते त्याचा लाभ रुग्णांनी घ्यावा असे मौलिक प्रतिपादन आमंदार टेकचंद सावरकर यांनी केले.
ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या उपजिल्हा रुग्णालय कामठी येथील आयोजित महाआरोग्य शिबिरात दिलेल्या भेटीत व्यक्त केले व एकूण शिबिराचा आढावा घेतला. दरम्यान आमदार टेकचंद सावरकर म्हणाले सर्वसामान्यांना आरोग्याच्या सेवा मोफत स्वरूपात मिळाव्यात यासाठी केंद्र शासनांमार्फत अनेकविध योजना राबविण्यात येतात .आरोग्य व कुटुंब कल्याण कार्यक्रमा अंतर्गत जागरूकता निर्माण व्हावी व सर्वसामान्यांना सेवा उपलब्ध व्हाव्यात या दृष्टिकोनातून या महाआरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
याप्रसंगी भाजयुमो जिल्हाध्यक्ष आदर्श पटले,रुग्ण सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ महेश महाजन, भाजप कामठी शहर अध्यक्ष संजू कनोजिया, भाजप कामठी शहर कार्याध्यक्ष राजेश खंडेलवाल, भाजपा कामठी शहर महामंत्री उज्वल रायबोले,सुनिल खानवानी, विजय कोंडुलवार,पंकज वर्मा,लालु यादव,राजेश देशमुख,आशु अवस्थी,बंटी पिल्लै,प्रितिताई कुल्लरकर व इतर पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
या शिबिरात रुग्णांना सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा करून देण्यात आल्या होत्या.आयुष्यमान भारत आजादी का अमृत महोत्सव महाआरोग्य मेळावा चे उदघाटन पंचायत समिती चे सभापती उमेश रडके यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आले .याप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ संजय माने, वैद्यकीय अधीक्षक डॉ नयना दुफारे, वैद्यकीय अधिकारी डॉ शबनम खाणुनी, डॉ अली, डॉ अली, डॉ वाघमारे , बीडीओ अंशुजा गराटे, सहाय्यक गट विकास अधिकारी प्रदीप गायगोले, आरोग्य विस्तार अधिकारी मनीष दीघाडे आदी उपस्थित होते.शिबीराला मोठ्या संख्येनी उपस्थिती दर्शविली होती.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com