सत्यजित तांबे यांना पक्षातून निलंबित करा, थेट दिल्लीतून आदेश; हायकमांड काय म्हणाले? 

मुंबई: नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत बंडखोरी करणं काँग्रेस नेते सत्यजित तांबे यांच्या अंगलट येणार असल्याचं दिसत आहे. सत्यजित तांबे यांना पक्षातून निलंबित करा, अशा सूचनाच काँग्रेस हायकमांडने दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे सत्यजित तांबे यांना कोणत्याही क्षणी निलंबित करण्यात येणार असल्याचं दिसत आहे. दरम्यान, कालच सत्यजित तांबे यांचे वडील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. सुधीर तांबे यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे. त्यामुळे तांबे पितापुत्रांना मोठा झटका बसला आहे.

काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांना नाशिक पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दिला होता. पण सुधीर तांबे यांनी अर्ज भरला नाही. त्यांचे चिरंजीव सत्यजित तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्यजित तांबे यांच्याविषयी आधीच सूचक विधान केलं होतं. त्यानंतर या राजकीय घडामोडी घडल्याने एकच खळबळ उडाली होती.

सुधीर तांबे यांनी अर्ज न भरल्याने त्याची काँग्रेसने गंभीरपणे दखल घेतली असून सुधीर तांबे यांना कालच पक्षातून निलंबित केलं आहे. तर, सत्यजित तांबे यांनाही पक्षातून निलंबित करा, असे आदेशच दिल्लीतून हायकमांडने राज्य काँग्रेसला दिल्याचं वृत्त आहे. त्यामुळे राज्य काँग्रेस कोणत्याही क्षणी सत्यजित तांबे यांची पक्षातून निलंबित करण्याची शक्यता आहे.

सत्यजित तांबे यांना पक्षातून निलंबित करण्याच्या सूचना हायकमांडने दिल्याचं वृत्त आल्यानंतर सत्यजित तांबे यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. मात्र, या सर्व राजकीय घडामोडींवर सत्यजित तांबे येत्या 18 आणि 19 जानेवारी रोजी आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. त्यामुळे सत्यजित तांबे काय गौप्यस्फोट करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भाजपा प्रदेश माध्यम प्रमुखपदी नवनाथ बन

Mon Jan 16 , 2023
नागपूर :-भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश माध्यम विभाग प्रमुखपदी पत्रकार नवनाथ बन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बन यांच्या नियुक्तीची घोषणा केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत नागपूरमध्ये बन यांनी रविवारी भाजपामध्ये प्रवेश केला. गेल्या १५ वर्षांपासून बन हे माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. दैनिक गावकरी पासून त्यांच्या पत्रकारितेतील कारकीर्द सुरु झाली. मराठवाडा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com