*१३ तालुक्यात ६ हजार ६७८ कर्मचारी लागले कामाला*
नागपूर :- नागपूर जिल्ह्यातील तेराही तालुक्यामध्ये मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणासाठी आज सुरुवात झाली आहे.
नागपूर जिल्ह्यामध्ये 4, लाख 42 हजार 897 घरातील 22 लाख 14 हजार 485 लोकसंख्या तपासली जाणार आहे. राज्य मागासवर्गीय आयोगाने नेमून दिलेल्या सूचनानुसार हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी या संदर्भातील आदेश निर्गमित केल्यानंतर आजपासून तेराही तालुक्यामध्ये तपासणीला सुरुवात झाली आहे. नागपूर ग्रामीणमध्ये निर्धारित लोकसंख्येची तपासणी करण्यासाठी 6 हजार 678 प्रगणक नियुक्त करण्यात आले आहे.
नागपूर महानगर क्षेत्रासाठी 27 हजार 634 घरांची संख्या असून 24 लाख 5 हजार 656 लोकसंख्येसाठी 7055 प्रगणक ही तपासणी करणार आहे. नागपूर महानगरपालिकेच्या सर्वेक्षणाला ही लवकरच सुरुवात होणार आहे.
नागपूर विभागात लोकसंख्या एकूण एक कोटी 17 लाख 53 हजार आहे. या लोकसंख्येसाठी 29 हजार 42 प्रगणकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यात मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण 31 जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना आयोगाने दिला आहेत त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे ग्रामीण भागात सर्वेक्षणासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.