जिल्ह्यात 1 लाख 16 हजार मतदारांची वाढ

 जिल्हाधिकाऱ्यांची पत्रकार परिषदेत माहिती

 अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

नागपूर :- 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीच्या संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत आज अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. यात जिल्ह्यात 1 लाख 16 हजार 762 मतदारांची वाढ झाली आहे. यात 17 ते 19 वयोगटातील 88 हजार 449 युवा मतदारांचा समावेश असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

मिशन युवा एन 2023-2024 कार्यक्रमांतर्गत 17 ते 19 वर्षे वयोगटातील एकूण 75 हजार किमान नव मतदारांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. हे उद्दिष्ट लक्षणीयरीत्या साध्य झाले आहेत. या मोहीमेंतर्गत 88 हजार ४४९ युवा मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे.

लिंग गुणोत्तर ९६४ वरून ९७८ झाले आहे. एकूण ४७२ महाविद्यालयांमध्ये मिळून एकूण ५१२ विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले. एकूण ३८८९ विमुक्त व भटक्या जमातीच्या नव मतदारांची नोंदणी करण्यात आली. जिल्ह्यात एकूण एक लाख ८ हजार ३१७ मतदारांची नावे नमुना सात भरून वगळण्यात आली आहेत. 

सर्व प्रकारचे मिळून 3 लक्ष 81 हजार 522 अर्ज भरून घेण्यात आले व हे प्रमाण हे राज्यातून 4 थ्या क्रमांकावर आहे. नव मतदारांच्या मतदार नोंदणीबाबत राज्याचा जिल्हयाचा तिसरा क्रमांक आहे. ज्या मतदारांची नावे आज रोजीच्या मतदार यादीत समाविष्ट झाले नसतील त्यांनी आपली नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे.

मतदार नोंदणीच्या उत्कृष्ट मतदार जागृती पुरस्कार 2024 अंतर्गत नागपूर जिल्हाधिकारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी व मतदार नोंदणी अधिकारी, रामटेक विधानसभा मतदार संघ यांची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी मुख्य निवडणूक अधिकारी यांचे कार्यालयाने निवड केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

30 जानेवारीला ‘रन फॅार लेप्रसी’चे आयोजन जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांची माहिती

Wed Jan 24 , 2024
नागपूर :- ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये ३० जानेवारी कुष्ठरोग निवारण दिन व पंधरवडयामध्ये विविध प्रकारचे आरोग्य शिक्षण उपक्रम विभागातर्फे राबविण्यात येणार आहे. यामध्ये रन फॅार लेप्रसी मॅरेथॉनचे आयोजन फ्रीडम पार्क येथे करण्यात आले आहे. मॅरेथॅानमध्ये तीन वयोगट असणार आहेत. १८ ते ३० वर्षे वयोगट, ३० ते ४५ वर्षे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com