नागपूर जिल्ह्यामध्ये मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणाला सुरुवात

*१३ तालुक्यात ६ हजार ६७८ कर्मचारी लागले कामाला* 

नागपूर :- नागपूर जिल्ह्यातील तेराही तालुक्यामध्ये मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणासाठी आज सुरुवात झाली आहे.

नागपूर जिल्ह्यामध्ये 4, लाख 42 हजार 897 घरातील 22 लाख 14 हजार 485 लोकसंख्या तपासली जाणार आहे. राज्य मागासवर्गीय आयोगाने नेमून दिलेल्या सूचनानुसार हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी या संदर्भातील आदेश निर्गमित केल्यानंतर आजपासून तेराही तालुक्यामध्ये तपासणीला सुरुवात झाली आहे. नागपूर ग्रामीणमध्ये निर्धारित लोकसंख्येची तपासणी करण्यासाठी 6 हजार 678 प्रगणक नियुक्त करण्यात आले आहे.

नागपूर महानगर क्षेत्रासाठी 27 हजार 634 घरांची संख्या असून 24 लाख 5 हजार 656 लोकसंख्येसाठी 7055 प्रगणक ही तपासणी करणार आहे. नागपूर महानगरपालिकेच्या सर्वेक्षणाला ही लवकरच सुरुवात होणार आहे.

नागपूर विभागात लोकसंख्या एकूण एक कोटी 17 लाख 53 हजार आहे. या लोकसंख्येसाठी 29 हजार 42 प्रगणकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यात मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण 31 जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना आयोगाने दिला आहेत त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे ग्रामीण भागात सर्वेक्षणासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

NewsToday24x7

Next Post

जिल्ह्यात 1 लाख 16 हजार मतदारांची वाढ

Wed Jan 24 , 2024
 जिल्हाधिकाऱ्यांची पत्रकार परिषदेत माहिती  अंतिम मतदार यादी प्रसिद्ध नागपूर :- 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीच्या संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत आज अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. यात जिल्ह्यात 1 लाख 16 हजार 762 मतदारांची वाढ झाली आहे. यात 17 ते 19 वयोगटातील 88 हजार 449 युवा मतदारांचा समावेश असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com