सुपर 75 योजनेतील विदयार्थ्यांना मिळणार NEET/ JEE /NDA/CA चे धडे 

नागपूर :- नागपूर महानगरपालिका, शिक्षण विभाग व ACI नागपूर यांच्या सहकार्याने मनपा शाळेत शिक्षण घेणा-या हुशार व होतकरु विदयार्थ्यांना NEET/ JEE /NDA/CA च्या स्पर्धा परीक्षा देता याव्या म्हणुन सुपर 75 योजना सन 2021 पासुन सुरु करण्यात आली आहे. तत्कालीन महापौर दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पनेतून या योजनेची सुरवात करण्यात आली. या योजने अंतर्गत मनपा शाळेतील 75 हुशार व होतकरु विदयार्थ्यांची निवड करुन त्यांना दोन वर्ष फाऊडेंशन कोर्स शिकविल्या जातो. तसेच ते 10 उत्तीर्ण झाल्यानंतर ACI नागपूर यांच्या सहकार्याने या विदयार्थ्यांना NEET/ JEE /NDA/CAया स्पर्धा परिक्षाचे मोफत मार्गदर्शन ACI नागपूर संघटनेच्या विविध शिकवणी वर्गामधुन केले जाते. या योजनेमुळे मनपा शाळेतील इयत्ता 10 वी निकाल वाढला असुन विदयार्थी 96% पर्यंत गुण घेऊ लागले आहे.

सन 2022 मध्ये निवड झालेल्या 75 विदयार्थ्यांना NEET/ JEE /NDA/CAया स्पर्धा परिक्षाचे मोफत मार्गदर्शन करण्याबाबतचा शुभारंभ आज दि.21.09.2024 रोजी मा.दयाशंकरजी तिवारी, माजी महापौर यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आला. या वेळेस त्यांनी उपस्थित विदयार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच या योजनेचे ACI नागपूर संघटनेचे योजना प्रमुख महेश अंधारे यांनी सुध्दा विदयार्थ्यांना शिकवणी वर्गातील नियम पाळण्याबाबतच्या व नियमितपणे शिकवणी वर्गात उपस्थित राहण्याचा सल्ला दिला. तसेच शहरातील संघटनेशी सलग्न 10 नामांकित शिकवणी वर्गात या विदयार्थ्यांना शिकविण्यात येईल असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक साधना सयाम, शिक्षणाधिकारी, मनपा यांनी केले तर संचालन प्रशांत टेभुर्णे, शाळा निरीक्षक तथा संयोजक सुपर 75 योजना यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अंतर्राष्ट्रीय हॉकी खिलाड़ी मृणाल चौबे बने एन आई एस पटियाला के एक्सपर्ट अतिथि व्याख्याता

Sun Sep 22 , 2024
– रचा इतिहास : विश्व प्रसिद्ध राष्ट्रीय क्रीड़ा संस्थान मे प्रशिक्षु कोचों को देंगे प्रशिक्षण छत्तीसगढ़ :- के अंतर्राष्ट्रीय हॉकी खिलाड़ी मृणाल चौबे को देश की प्रतिष्ठित खेल संस्था, खेलो के मक्का कहे जाने वाले राष्ट्रीय क्रीड़ा संस्थान (एन आई एस) पटियाला में एक्सपर्ट अतिथि व्याख्याता के रूप में आमंत्रित किया गया है। यह छत्तीसगढ़ राज्य के लिए गर्व का […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com