संदीप कांबळे,कामठी
सूर्य आग ओकतोय, उकाड्यानी नागरिक त्रस्त,सामाजिक कार्यकर्त्यांना पाणपोईचा पडला विसर!
कामठी ता प्र 27:-सध्या उन्हाळा अधिकच तिव्रतेणे तापू लागला असून नागरिकांनी दुपारी घरातुन बाहेर निघणे टाळत आहेत तर या उन्हात फिरायला निघाल्या नागरिकांना विविध आजाराचे निमंत्रण मिळत आहे यामध्ये उन्हामुळे चक्कर येणे, भूक न लागणे, अशक्त वाटणे यासह विविध आजाराचे रुग्ण वाढीवर आहेत त्यामुळे ‘आला उन्हाळा तब्येत सांभाळा’ असे आव्हान प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
मागिल काही दिवसांपासून तापमानात झपाट्याने वाढ होऊन रौद्ररूप धारन करुन जनतेस त्रस्त करून सोडले आहे.उन्हाच्या दाहकतेने रस्ते हे बहू प्रमाणात निर्मनुष्य दिसत आहेत, सर्वत्र शुकशुकाट पसरला आहे. मात्र या उन्हामुळे शेतीच्या मशागतीवर विपरीत परिणाम दिसून येत आहे.
उन्हाच्या वाढत्या झळा, घामाच्या धारा यामुळे उन्हाळा हा नकोसा वाटतो मात्र नाईलाजास्तव कामानिमित्त घराबाहेर पडणारे मंडळी उन्हापासून बचाव करण्यासाठी गॉगल, दुपट्टा, तसेच टोपी व छत्रीचा वापर करीत आहेत मात्र नागरिकांच्या सोयीसाठी सामाजिक कार्यकर्त्यांकडून सामाजिक भावनेतून ठिकठिकाणी होणारी पाणपोईची व्यवस्था ही दिसुन येत नाही .उन्हाळ्यात विशेषता थकवा येणे,ताप येणे, त्वचा कोरडी पडणे, भूक न लागणे, चक्कर येणे, निरुत्साही होणे, डोके दुखणे, रक्तदाब वाढणे, मानसिक अस्वस्थता, बेशुद्धवस्था आदी च्या समस्या निर्माण होतात तेव्हा नागरिकानो उन्हाळ्यात साधे व ताजे अन्न घेणे, शिळे अन्न, मासे,मटण खाने टाळणे, जेवणानंतर वाटीभर ताक किंवा सोलकढी घ्यावी, उन्हाळ्यात भरपूर पाणी प्यावे, उन्हातून घरी आल्यानंतर फ्रीज अथवा कुलरचे अतिगार पाणी पिऊ नये. नैसर्गिक थंडावा देणारी फळे आहारात घेणे, घरीच केलेली सरबते पिणे, उन्हात बाहेर पडताना डोळे, डोके(मेंदू)व कान रुमालाने वा स्कार्फने बांधून बाहेर पडा तसेच गॉगल किंवा टोपीचा आवर्जून वापर करा असे आव्हान सुद्धा करण्यात आले आहे.
‘आला उन्हाळा तब्येत सांभाळा’
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com