संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– मागिल अडीच वर्षांपासून ब्रेथ ऍनालायझर मशीन पडली धूळखात
कामठी :- मद्यप्राशन करून वाहन चालविताना स्वतःबरोबर रस्त्यावरून चालणाऱ्या इतरांचेही जीव धोक्यात घालणाऱ्या तळीरामाना कोरोनाच्या नावाखाली मागील चार वर्षांपासून मोकाट रान मिळाले आहे.कोरोनाच्या संसर्गामुळे मद्यपी वाहनचालकांची तपासणी करायची नाही त्यांना ब्रेथ एनालायझर लावायचा नाही असे आदेश शासनाने दिल्यामुळे मागील चार वर्षांपासून या तळीरामाना वाहतूक पोलिसांकडून ना दंड केला जात आहे ,ना कुठली कारवाही केली जात आहे तर पोलिसांकडे असलेले हे ब्रेथ ऍनालायझर मशिन मागील चार वर्षांपासून धूळखात पडले आहेत, यातून तळीरामाना निर्माण झालेला वाहतूक पोलिसांचा अभयपणा मुळे तळीराम आपल्याच धुंदीत वावरत आहेत.दररोज तळीराम बिअर बार वा देशी दारू च्या दुकान मधून तसेच कुठल्यातरी ढाब्यावरून दारू पिऊन निघतात परंतु वाहतूक पोलिसांना या तळीरामावर कारवाहीच करता आली नाही.
मागील चार कुणीच मद्यप्राशन करून वाहन चालविले नाही असे म्हटले तर त्यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही मग मद्यप्राशन करून वाहन चालविण्यात आले दररोज बिअर बार व दारू दुकानातुन मद्यपी मद्यप्राशन करून दिवसा व रात्री वाहतूक करतात मग पोलीस यावर कारवाही का करीत नाही असा प्रश्न सहजच पुढे येतो परंतु कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी मद्यपी वाहन चालकांवर कारवाहो होत नाही ,कारवाहो करण्यासाठी ब्रेथ एनालायझर चा वापर होत नाही याचे जणू एक आश्चर्य च आहे.तेव्हा कोरोनाचा संसर्ग हा आटोक्यात आला आहे तेव्हा पोलिसांनी या तळीरामावर ड्रक अँड ड्राइव्ह ची कारवाही सुरू करण्यात यावी अशी मागणी येथील जागरूक नागरिक करीत आहेत.
@ फाईल फोटो