नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील बॉक्सिंग स्पर्धेमध्ये वरिष्ठ मुले आणि वरिष्ठ मुलींमध्ये कामठी येथील यश साकेत आणि नागपूर येथील मानसी निमजे विजेते ठरले. रेशीमबाग मैदान येथे ही स्पर्धा पार पडली.
वरिष्ठ गटात ८६ किलोवरील वजनगटात कामठी येथील यश साकेत ने नागपूर येथील मोहम्मद अख्तर चा पराभव करुन विजय मिळविला. वरिष्ठ गटातील मुलींच्या ६३ ते ६६ किलो वजनगटात नागपूर येथील मानसी निमजे ने काटोल येथील स्नेहा वानवे ला नमवून विजय मिळविला. ज्यूनिअर मुलांच्या गटात ६६ किलोवरील वजनगटात नागपूर येथील अनंत देशमुख ने नागपूर येथील तन्मय कारेवार चा पराभव केला. मुलींच्या स्पर्धेत ६३ किलोवरील वजनगटात नागपुरातील सानवी महाजन आणि अवनी चव्हाण यांच्यातील अंतिम लढतीत सानवीने प्रथम क्रमांक पटकाविले.