हिंदू विद्या भवन शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

नागपूर :-हिंदू विद्या भवन, शांतीनिकेतन, हनुमान नगर, नागपूर या शाळेत नुकतेच वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले. स्नेहसंमेलनाचे उद्घाटन आमदार मोहन मते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कल्याणी हुमने, क्राइम पोलीस निरीक्षक, अजनी, नागपूर, दिव्या धुरडे, माजी नगरसेविका, नागपूर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक व स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबईचे विश्‍वस्त व माजी अध्यक्ष अरूण जोशी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात दीप प्रज्वलनाने झाली.

कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात प्राविण्याप्राप्त विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. दिव्या धुरडे आपल्या भाषणात म्हणाल्या, ‘शाळेचा विकास करतांना जुन्या परंपराही जपल्या जाव्यात.’ कल्याणी हुमने म्हणाल्या, ‘विद्यार्थ्यांनी व पालकांनी मोबाईल वापरतांना कोणती काळजी घ्यावी याबद्दल मागदर्शन केले.’ मोहन मते, बोलतांना म्हणाले, ‘शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात यावा. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या बहुआयामी प्रतिभेला वाव मिळेल असे शिक्षणही त्यांना देण्यात यावे.’ संस्थेचे संस्थापक  अरूण जोशी यांनीही स्नेहसंमेलनास आपल्या शुभेच्छा देत, वंदे मातरम्च्या जयघोषाने सांस्कृतिक कार्यक्रमांची सुरवात केली.

कार्यक्रमाचे संचालन रितेश पंडेल व पुजा बावने यांनी केले, प्रास्ताविक प्रा. कल्पना जोग यांनी केले तर आभार प्रदर्शन  रेणुका वर्मा यांनी केले. स्नेहसंमेलनाच्या यशस्वीतेकरिता मुख्याध्यापिका दिपिका वाठ, शिक्षिका केतकी नागरीकर,  उज्ज्वला राऊत, रूपाली ढोरे, शिल्पा मुंजेवार, मंजुश्री आटे,  रूचिका कटकमवार, तेजस्विनी पंचबुधे, कोमल फिस्के,  मनिषा मराठे, अंशिता मानपीया, गायत्री ठाकरे, ॠुतुजा जिवणे, जयश्री कसरे, प्रिती जांभूळकर, शैला कुकडे, क्रिडा शिक्षक आदर्श चोपकर यांंनी विशेष परिश्रम घेतले.

 

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com