शासकीय देयके ई-बिल प्रणालीव्दारेच कोषागारात सादर करा  – आशिष कुमार सिंह

– ई-बिल, ई-व्हाऊचर प्रणालीचे उद्घाटन

नागपूर :-  विविध शासकीय कार्यालयातील दुरध्वनी, विद्युत आदि देयके ई-बिल प्रणालीव्दारे कोषागारात सादर करणे सुलभ झाले असुन सर्वच देयके या प्रणालीव्दारे स्विकारण्यात येणार आहेत. ई-बिल प्रणालीव्दारे कोषागारात देयके सादर करुन या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन कोषागार विभागाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जिल्हा कोषागार कार्यालयात ई-बिल प्रणाली, ई-बिल व्हाऊचर तसेच ई-हस्ताक्षर प्रणालीचे उद्घाटन अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह यांच्या हस्ते झाले. यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

लेखा व कोषागारे संचालक दिपा देशपाडे, सहसंचालक ज्योती भोंडे, स्वप्नजा सिदंकर, सहसंचालक (माहिती व तंत्रज्ञान) गिता नागर, वरिष्ठ कोषागार अधिकारी बालकृष्ण नायर, विशाल नलदूरकर, महेश घोडके आदी यावेळी उपस्थित होते.

सर्व शासकीय कार्यालयातील दुरध्वनी, विद्युत आदि देयके इलेक्ट्रॉनिकली सादर करणे शक्य झाले आहेत. इतर देयके सुध्दा या प्रणालीव्दारे स्विकारण्याची सुविधा लवकरच उपलब्ध होईल. आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आशिष कुमार सिंह यांनी यावेळी केले. प्रारंभी कोषागारातील ई-बिल व्हाऊचर या प्रणालीची पाहणी अपर मुख्य सचिवांनी केली.

जिल्हा कोषागार कार्यालयाला प्रमाणके इलेक्ट्रॉनिकली महालेखाकार कार्यालयाकडे सादर करणे सुलभ होणार असून या कार्यप्रणालीमुळे आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना संदेशवाहकावीना देयके कोषागारात इलेक्ट्रॉनिकली सादर करता येतील. टप्या-टप्याने सर्व आहरण व संवितरण अधिकारी या सुविधेचा उपयोग घेवू शकतील. या प्रणालीव्दारे यापुढे देयके सादर करावीत असे आवाहन लेखा व कोषागारे विभागाच्या सहसंचालक ज्योती भोंडे यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मतदान केंद्रावर व्ही व्ही पैट मशीन चे प्रात्यक्षिक

Fri Dec 29 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- भारत सरकार निवडणुक आयोग च्या वतीने आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मतदान मशीन व्ही व्ही पैट मशीन चे प्रात्यक्षिक प्रभाग 15 तील मतदान केंद्र क्र 78 आणि 79 येथे आज देण्यात आले. या वेळी तहसील कार्यालय चे मंडळ अधिकारी संजय कांबले, माजी नगरसेविका संध्या रायबोले,न प शाळेचे मुख्याध्यापक मोहम्मद तारिक, सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयाच्या प्रभारी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com