युवक काँग्रेस व्दारे काढला मशाल मोर्चा

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– ” रोजगार दो, न्याय दो ” युवक काँग्रेस ची मागणी.  

कन्हान :- नागपुर जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेस व रामटेक विधानसभा युवक काँग्रेस च्या वतीने कन्हान येथे भारतात वाढत्या बेरोजगारी विरोधात ” रोजगार दो, न्याय दो ” या उपक्रमाच्या माध्यमातुन मशाल मोर्चा काढण्यात आला.

अखिल भारतीय युवक काँग्रेस चे अध्यक्ष श्रीनिवास यांच्या आदेशानुसार जिल्हा काँग्रेस कमेटी उपाध्यक्ष नरेश बर्वे यांच्या नेतृत्वात व माजी जि प अध्यक्षा रश्मी बर्वे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतात वाढत्या बेरोजगारी विरोधात ” रोजगार दो, न्याय दो ” या उपक्रमाच्या माध्यमातून कन्हान येथे सायंकाळी तारसा चौक ते आंबेडकर चौक पर्यंत मशाल मोर्चा काढुन केंद्र व राज्य सरकार ला जागवि ण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात रोजगार दो, न्याय दो अशी प्रमुख मागणी करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शेतकरी कष्टकरी महासंघाची टेकाडी ला जनजागृती संवाद संपन्न

Tue Feb 27 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान :- जवळच पारशिवनी तालुक्यातील टेकाडी (को.ख) गावात शेतकरी, कष्टकरी महासंघाची जन जागृती संवाद बैठकीला गावातील शेतक-यानी उत्सफुर्त प्रतिसाद देत शेतक-यांच्या हितार्थ लढयात सहभागी होऊन सहकार्य करण्याची हमी दिली. आपण भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षाचा उत्सव साजरा करित असुन कृषी प्रदान देशात शेतकरी दैना अवस्थेत येऊन पोहचाला तरी कुणीही शेतक-यांच्या ज्वलंत प्रश्नावर बोलताना दिसत नसल्याने रामटेक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights